IPL 2021, Royal Challengers Bangalore vs Mumbai Indians Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) चा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं आजच्या सामन्यात मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी घातली. आतापर्यंत असा पराक्रम करणारा तो पहिलाच भारतीय आणि जगातला पाचवा फलंदाज ठरला आहे. मुंबई इंडियन्सनं ( MI) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला अन् विराटनं पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून ट्रेंट बोल्टचे स्वागत केले. पण, देवदत्त पडिक्कलच्या विकेटनं RCBला धक्का बसला. त्यानंतर विराटनं जसप्रीत बुमराहचा समाचार घेताना विश्वविक्रम केला.
आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात मुंबईला सलग दोन पराभवांचा सामना करावा लागला आहे आणि त्यांची सहाव्या स्थानी घसरण झाली आहे. RCBचीही पराभवाची मालिका कायम असली तरी ते तिसऱ्या स्थानावर आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर २८ वेळा एकमेकांना भिडले आहेत, त्यात रोहितच्या संघानं १७ विजय मिळवले आहेत. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आजच्या सामन्यात हार्दिक पांड्या खेळणार आहे ( Hardik Pandya Playing Today) RCBनं आजच्या सामन्यात तीन बदल केले आहेत. वनिंदू हसरंगा, टीम डेव्हिड आणि नवदीप सैनी यांच्याजागी डॅन ख्रिस्टियन, कायले जेमिन्सन व शाहबाज अहमद यांना संधी मिळाली आहे.
ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. जसप्रीत बुमराहला खणखणीत षटकार खेचून त्यानं हा पराक्रम केला. त्याला या सामन्यात हा पल्ला गाठण्यासाठी १३ धावा करायच्या होत्या.
ट्वेंटी-२० त सर्वाधिक धावा करणारे फलंदाजख्रिस गेल - १४,२७५किरॉन पोलार्ड - ११,१९५शोएब मलिक - १०,८०८डेव्हिड वॉर्नर - १०,०१९विराट कोहली - १०,०००*