चेन्नई - सर्वाधिक वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघाला सलामीच्या लढतीत पुन्हा एकदा पराभूत व्हावे लागले. (MI vs RCB) अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या लढतीत विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सला दोन विकेट्सनी पराभूत केले. बंगळुरूच्या या विजयात एबी डिव्हिलियर्सची (AB de Villiers) तुफानी फलंदाजी निर्णायक ठरली. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) सामन्यानंतर संघाच्या पराभवामागचे नेमके कारण सांगितले आहे. ("That plan failed and AB de Villiers tilted the match to RCB" Rohit Sharma explained the reason for Mumbai's defeat)
आयपीएलमध्ये नवव्यांदा मुंबई इंडियन्सला सलामीच्या लढतीत पराभूत व्हावे लागले आहे. मात्र पहिल्या लढतीमधील संघाच्या कामगिरीबाबत निराश नसून पहिला सामना नाही तर स्पर्धेचे विजेतेपद पटकावणे महत्त्वाचे आहे, असे रोहित शर्माने म्हटले आहे. सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, पहिला सामान नव्हे तर आयपीएलचे विजेतेपद पटकावणे हे महत्वाचे आहे. बंगळुरूविरुद्धची लढत चांगली झाली. आम्ही त्यांना सहजपणे जिंकू दिलं नाही. मात्र आम्ही प्रथम फलंदाजी करताना उभारलेल्या धावसंख्येबाबत समाधानी नव्हतो. आम्ही २० धावा कमी बनवल्या.’’
अखेरच्या चार षटकांमध्ये एबी डिव्हिलियर्सला बाद करण्याची आमची योजना होती. अखेरची चार षटके उरली होती तेव्हा आम्ही डिव्हिलियर्सला बाद करण्याची रणनीती आखली होती. त्यासाठीच आम्ही बुमराह आणि बोल्टकडून गोलंदाजी करवून घेत होतो. मात्र आमची ही रणनीती यशस्वी ठरली नाही आणि डिव्हिलियर्सने हा सामना आरसीबीकडे झुकवला, असे रोहित शर्मा म्हणाला.
आयपीएल २०२१ मध्ये काल मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये झालेल्या सलामीच्या लढतीत मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये ९ बाद १५९ धावा बनवून बंगळुरूसमोर १६० धावांचे आव्हान ठेवले होते. बंगळुरूच्या हर्षल पटेलने २७ धावा देत ५ बळी टिपले होते. दरम्यान, एबी डिव्हिलियर्सने केलेल्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर बंगळुरूने हा सामना दोन विकेट्स राखून जिंकला.
Web Title: IPL 2021, MI vs RCB: "That plan failed and AB de Villiers tilted the match to RCB" Rohit Sharma explained the reason for Mumbai's defeat ...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.