Indian Premier League 2021 : गतविजेता मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( IPL 2021 : MI vs RCB T20 Live Score Update) या हायव्होल्टेज सामन्यानं इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाची ( IPL 2021) सुरुवात होत आहे. देशातील कोरोना परिस्थिती पाहता मुंबई, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता आणि अहमदाबाद या सहा शहरांमध्ये आयपीएलचे सामने खेळवण्यात येणार आहे. त्यात यंदाच्या आयपीएलमध्ये एकाही संघाला घरच्या मैदानावर खेळता येणार नाही. त्यामुळे तटस्थ ठिकाणी खेळण्यावत येणाऱ्या सामन्यांमुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. मुंबई आणि बंगळुरू यांच्यातला पहिलाच सामना चेन्नईचे एम ए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. त्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ राजेशाही थाटात स्टेडियमच्या दिशेनं रवाना झाला आहे. ( Mumbai Indians depart for season opener) क्विंटन डी कॉक नाही खेळणार; नव्या भीडूसह मुंबई इंडियन्स तगडी Playing XI मैदानावर उतरवणार!
IPL 2021 Rules: Don’ts: काय करू नये...
- कुटुंबातील सदस्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता बायो-बबलमध्ये येत येणार नाही. त्यामुळे जर कुटुंबातील एखादा सदस्य खेळाडू किंवा स्टाफला भेटण्यासाठी येणार असेल, तर त्याची कल्पना BCCI व मुख्य वैद्यकिय अधिकारी यांना द्यावी लागेल. संपूर्ण स्पर्धेत खेळाडूंप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना बायो बबलच्या बाहेर जाता येणार नाही. MI vs RCB Live Score, IPL 2021 MI vs RCB, MI vs RCB Live match
- हॉटेलमधील अन्य पाहुण्यांना भेटण्याची मनाई. हॉटेलमधील पाहुण्यांना आणि खेळाडूंना वेगळी विंग देण्यात आली आहे. त्यामुळे पाहुण्यांना भेटण्याची सक्त मनाई आहे. Mi vs RCB Live Score Updates
- मीडियाला प्रवेश नाकारण्यात आलेला नाही. खेळाडूंनीही मीडियाच्या प्रतिनिधिंना भेटू नये आणि IPL 2021तही मीडियाला परवानगी दिली गेलेली नाही.
- सॉफ्ट सिग्नलचा नियम यंदाच्या आयपीएलमध्ये नसेल. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सॉफ्ट सिग्नल निर्णयावर कर्णधार विराट कोहलीनं नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे तो नियम आयपीएल २०२१त नसेल. MI vs RCB, MI Vs RCB live score,
- चेंडूला थूंकी लावू नये.
IPL 2021 Rules: Do’s: काय करावं...
- सात दिवसांचं सक्तीचं क्वारंटाईन - आयपीएल बायो-बबलमध्ये दाखल होताच सात दिवसांच्या क्वारंटाईन कालावधी खेळाडूंना पूर्ण करावा लागेल. हाच नियम खेळाडूंच्या कुटुंबीयांनाही लागू असेल.
- या स्पर्धेत बबल-टू-बबल असे ट्रान्स्फर असणार आहे. ( bubble-to-bubble transfers). याचा अर्ध एखादा खेळाडू किंवा कोचिंग स्टाफचा सदस्य आंतरराष्ट्रीय मॅचमधूल आल्यास तो आयपीएल बायो-बबलमध्ये क्वारंटाईन कालावधी पूर्ण न करताच दाखल होऊ शकतो. पण, ते खेळाडू किंवा स्टाफ चार्टर्ड विमान किंवा प्रायव्हेट कारनं येत असेल तरच त्याला आयपीएल बायो-बबलमध्ये येता येईल.
- बीसीसीआयच्या आदेशानुसार आयपीएलमधील प्रत्येक संघाचा डाव ९० मिनिटांच्या आत संपायला हवा. याआधी प्रत्येक डावाचं २० वं षटक ९० व्या मिनिटाला सुरु व्हायला हवं, असा नियम होता. पण आता नियमात बदल करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार सामन्याचं २० वं षटक ९० व्या मिनिटाला संपायला हवं.
- बबल बाहेरील खेळाडूशी संपर्क आल्यास मैदानावरील खेळाडूनं त्वरित जर्सी बदलावी.
- चेंडू सीमारेषेबाहेर गेल्यास त्याला सॅनिटाईझ करावे