IPL 2021, Royal Challengers Bangalore vs Mumbai Indians : विराट कोहली ( Virat Kohli) याच्या कर्णधारपद सोडण्यावरून बरीच चर्चा सुरू आहे. तो सहकारी खेळाडूंसाठी मैदानाबाहेर उपलब्ध नसायचा, तो कुणाचंच ऐकायचा नाही, अशा टीका आता होऊ लागल्या आहेत. त्यात संघातील वरिष्ठ खेळाडूनंच त्याची बीसीसीआयकडे तक्रार केल्याच्याही बातम्या फिरत आहेत. मैदनावर विराट आक्रमक, उद्धट वाटतो, परंतु त्याचे हे वागणे प्रतिस्पर्धीसाठी असते. तरीही काही लोकं त्याला उद्धटच म्हणतात आणि अशा लोकांच्या डोळ्यांत अंजन घालणारा प्रसंग आज घडला. विराटनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) सामना जिंकला असला तरी प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सच्या ( MI) चाहत्यांची मनंही जिंकली. सामन्यानंतर त्यानं अशी एक कृती केली, की त्याचा व्हिडीओ व फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
त्या पाच षटकांनी घात केला, फ्रंटसिटवर बसलेला मुंबई इंडियन्सचा संघ बॅकसिटवर फेकला गेला
प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली ( ५१) व ग्लेन मॅक्सवेल ( ५६) यांनी अर्धशतक झळकावली. श्रीसक भरतनेही ३२ धावांचे योगदान देताना RCBला ६ बाद १६५ धावांपर्यंत मजल मारून दिली. जसप्रीत बुमराहनं ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात रोहित शर्मा ( ४३) व क्विंटन डी कॉक ( २४) यांनी पहिल्या विकेटसाठी ५७ धावा जोडल्या, परंतु हे दोघंही माघारी परतताच मुंबईचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. कृणाल पांड्या, इशान किशन, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव व किरॉन पोलार्ड हे एकेरी धावसंख्येवरच माघारी परतले. हर्षल पटेलनं हॅटट्रिकसह १७ धावांत ४ विकेट्स घेतल्या. युझवेंद्र चहलनं ११ धावांत ३, तर ग्लेन मॅक्सवेलनं २३ धावांत २ विकेट्स घेतल्या. मुंबई इंडियन्सचा डाव १८.१ षटकांत १११ धावांवर गडगडला.
IPL 2021, MI vs RCB : मुंबई इंडियन्सनं सलग तिसरा पराभव झेलला, रोहित शर्मानं सांगितला सामना नेमका कुठे फिरला
नेमकं काय झालं?मागील आयपीएलमध्ये खोऱ्यानं धावा चोपून टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघात स्थान पटकावणारा इशान किशन ( Ishan Kishan) यंदाच्या पर्वात अपयशी ठरताना पाहायला मिळत आहे. त्याचा आगामी ट्वेंटी-२० संघात समावेश केला गेला आहे आणि अशात आता सुरू असलेल्या आयपीएलमधील त्याच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. पण, आजही तो ९ धावा करून माघारी परतला अन् मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर त्याला अश्रू अनावर झाले. त्याच्याशी विराट कोहलीनं संवाद साधला अन् त्याच्यात गमावलेला आत्मविश्वास परत आणण्याचा प्रयत्न केला. विराट व इशान यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विराट कोहली काय म्हणाला?''या विजयानं आनंद झालाच आहे. देवदत्तची विकेट लवकर गमावल्यानंतर कमबॅक करणं अवघड होतं. ग्लेन मॅक्सवेल व केएस यांनी अफलातून कामगिरी केली. आम्ही प्रयत्नच केले नसते तर बुमराहनं आम्हाला गुंडाळले असते. डॅन ख्रिस्टियननं अनुभव पणाला लावला, हर्षल पटेलनं पुन्हा एकदा अविश्वसनीय कामगिरी केली, '' असे विराटनं सांगितले.