Join us  

IPL 2021, MI vs RR : लोकेश राहुलसारखे अधिकच्या जबाबदारीचे ओझे घेऊन रोहित शर्मानं खेळू नये; RR विरुद्धच्या लढतीपूर्वी मिळाला सल्ला

IPL 2021, MI vs RR : प्ले ऑफच्या एका जागेसाठी आता चार संघ शर्यतीत आहेत आणि यापुढील प्रत्येक सामना जिंकण्याचा आणि अन्य स्पर्धकांच्या हरण्यावर एकमेकांचे लक्ष असणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2021 5:12 PM

Open in App

IPL 2021, MI vs RR : प्ले ऑफच्या एका जागेसाठी आता चार संघ शर्यतीत आहेत आणि यापुढील प्रत्येक सामना जिंकण्याचा आणि अन्य स्पर्धकांच्या हरण्यावर एकमेकांचे लक्ष असणार आहे. चार चार संघांमध्ये गतविजेत्या मुंबई इंडियन्सचाही ( Mumbai Indians) समावेश आहे आणि स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी आज त्यांना राजस्थान रॉयल्सचा ( Rajasthan Royals) सामना करावा लागणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा माजी खेळाडू संजय मांजरेकर ( Sanjay Manjrekar) यानं रोहितला सल्ला दिला आहे. त्यानं पंजाब किंग्सचा कर्णधार लोकेश राहुल याच्यासारखी सर्व जबाबदारी खांद्यावर घेऊन खेळू नये. रोहित हा आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो आणि त्यानं त्याच अप्रोचनं खेळावं, असा सल्ला मांजरेकरनं दिला.

आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात रोहित शर्माला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याला चार सामन्यांत ३३, ४३, ८ व ७ अशा धावा केल्या आहेत. त्यानं आतापर्यंत आयपीएल २०२१त ३१च्या सरासरीनं ३४१ धावा केल्या आहेत. संजय मांजरेकर म्हणाला, लोकेश राहुल ट्वेंटी-२० क्रिकेटच्या हिशोबानं आक्रमक फलंदाजी नाही करत. त्याच्यावर कर्णधारपदाचं दडपण जाणवतं आणि त्यामुळे त्याची फलंदाजी संथ होते. त्यामुळेच संघाला पराभव पत्करावा लागतोय. म्हणून रोहितनं त्याच्यासारखं खेळू नये.

संजय मांजरेकर यानं मुंबई इंडियन्सच्या अन्य फलंदाजांबाबतही मत व्यक्त केलं. 'मागील सामन्यात सूर्यकुमार यादवचा फॉर्म परतला आहे आणि ही संघासाठी सकारात्मक बाब आहे. त्याचा हाच फॉर्म आजच्या सामन्यातही पाहायला मिळेल. पण, हार्दिक पांड्याचे अपयश ही संघासाठी चिंतेची गोष्ट ठरतेय. प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी मुंबई इंडियन्सला आजचा सामना जिंकावाच लागेल.

टॅग्स :आयपीएल २०२१मुंबई इंडियन्सराजस्थान रॉयल्सरोहित शर्मा
Open in App