इंडियन प्रीमिअर लीगच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबई इंडियन्सला आज अशक्यप्राय २५०+ धावा करायच्या आहेत आणि सनरायझर्स हैदराबादवर १७०+ धावांनी विजय मिळवायचा आहे. हे अशक्यप्राय वाटत असले तरी इशान किशननं ( Ishan Kishan) तुफान फटकेबाजी करून सर्वांना थक्क केले. मागील सामन्यात सुर गवसलेल्या इशाननं आज हैदराबादच्या गोलंदाजांना अंगावर घेत १६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. त्याचा धावांचा वेग पाहता मुंबई इंडियन्स २५० काय तर ३०० धावाही सहज करेल असेच वाटत आहे. पण, हैदराबादनं आज अचानक कर्णधारच बदलल्यानं सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यात आजच्या सामन्यातील कर्णधार मनिष पांडे ( Manish Pandey) याच्या एका विधानाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे Fixing हा ट्रेंड सुरू झाला आहे.
कालच्या विजयानंतर कोलकाताच्या खात्यात १४ गुण झाले असून त्यांचा नेट रन रेट हा ०.५८७ इतका झाला आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असे सामने सुरू आहेत. मुंबईच्या खात्यात १२ गुण आहेत आणि त्यांनी हैदराबादला नमवले तर त्यांचेही १४ गुण होतील.पण, मुंबई इंडियन्सचा नेट रन रेट हा -०.०४८ इतका होता आणि त्यांना हैदराबादवर फक्त विजय पुरेसा नाही. मुंबईला उद्याच्या सामन्यात हैदराबादविरुद्ध २००+ धावा कराव्या लागतील आणि १७०+ धावांनी विजय मिळवावा लागेल. तरच ते प्ले ऑफमध्ये प्रवेश करू शकतात. मुंबई हे समिकरण जुळवतील असे चित्र दिसत आहेत.