Join us  

IPL 2021, MI vs SRH T20 Live : बाबो!; जॉनी बेअरस्टोनं असा SIX मारला की फ्रिजच्या काचा फुटल्या, Video

ipl 2021  t20 MI vs SRH live match score updates chennai मुंबई इंडियन्सच्या ५ बाद १५० धावांचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नर - जॉनी बेअरस्टो यांनी सनरायझर्स हैदराबादला धडाकेबाज सुरूवात करून दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 10:08 PM

Open in App

IPL 2021 : MI vs SRH T20 Live Score Update : मुंबई इंडियन्सच्या ५ बाद १५० धावांचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नर - जॉनी बेअरस्टो यांनी सनरायझर्स हैदराबादला धडाकेबाज सुरूवात करून दिली. बेअरस्टोनं पहिल्या षटकापासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानं ट्रेंट बोल्टच्या तिसऱ्या षटकात तीन खणखणीत चौकार व एक अफलातून षटकार खेचला. त्याचा हा षटकार एवढा भारी होता की डगआऊटमधील फ्रिजच्या काचा तुटल्या. ८व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बेअरस्टो हिट विकेट झाला. त्यानं २२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकार खेचून ४३ धावा कुटल्या. IPL 2021 : MI vs SRH T20 Live Score Update  

विजय शंकरनं दोन षटकांत सामना फिरवला अन् किरॉन पोलार्डनं दोन चेंडूंत इतिहास रचला

मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा ( Rohit Sharma) व क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) यांनी मुंबई इंडियन्सला ( MI) चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५५ धावा जोडल्या. विजय शंकरनं ( Vijay Shankar) दोन महत्त्वाच्या विकेट्स घेत SRHला सामन्यात कमबॅक करून दिले, परंतु किरॉन पोलार्डनं ( Kieron Pollard) अखेरपर्यंत खिंड लढवताना मुंबई इंडियन्सला ५ बाद १५० धावांपर्यंत मजल मारून दिली.   MI vs SRH, MI vs SRH live score

पहिल्याच षटकात क्विंटन डी कॉकनं दोन सुरेख चौकार मारून MIला सकारात्मक सुरुवात करून दिली. विजय शंकरनं  रोहित ( ३२) आणि  सूर्यकुमार यादव ( १०) यांना बाद केले. दोन महत्त्वाच्या विकेट्स पडल्यानंतर मुंबईची धावगती मंदावली. पण  पोलार्डनं २२ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ३५ धावा करताना मुंबईला ५ बाद १५० धावांपर्यंत मजल मारून दिली. आयपीएलमध्ये २०० षटकार मारणारा पोलार्ड हा सहावा खेळाडूस तर तिसरा परदेशी खेळाडू ठरला.  IPL 2021 MI vs SRH, MI vs SRH Live Match 

टॅग्स :आयपीएल २०२१सनरायझर्स हैदराबादमुंबई इंडियन्स