पंजाब किंग्सला काल राजस्थान रॉयल्सविरोधातील आयपीएल मॅचमध्ये 2 रन्सनी पराभव पत्करावा लागला. पंजाबने एक चुकीचा निर्णय घेतला आणि आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. ही चूक एवढी मोठी होती की सामना गमवावा लागला.
राजस्थान रॉयल्सविरोधातील या मॅचमध्ये पंजाबने ख्रिस गेलला खेळविले नाही. पंजाबने गेलऐवजी दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्करमला संधी दिली होती. त्याने 20 चेंडूत 26 धावा काढल्या. हा संथपणा पाहता काही रन्स जर जास्त झाले असते तर पंजाबला एवढे झुंजावे लागले नसते आणि विजयही पदरी पडला असता.
एडन मार्करम क्रीझवर असूनही पंजाबला जिंकवून देऊ शकला नाही. यामुळे पंजाबच्या टीम सिलेक्शनवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. पंजाब किंग्स जर गेलला संघात खेळविले असते तर 2 रन्सनी पराभव पत्करावा लागला नसता. राजस्थान रॉयल्सने पंजाबला 186 रन्सचे लक्ष्य दिले होते.
विजयासाठी 186 धावांचे लक्ष्य गाठताना पंजाबने 4 विकेट गमावून 183 रन्स बनविले. शेवटच्या 5 ओव्हरमध्ये पंजाबला 38 रन्स हवे होते. क्रिस मॉरिसच्या सोळाव्या ओव्हरमध्ये केवळ सहा रस्न आले. यानंतर पंजाबला शेवटच्या तीन ओव्हरमध्ये 18 रन्स हवे होते. पूरन आणि मार्कराम यांनी अत्यंत स्लो खेळत लक्ष्यापर्यंत पोहोचविले परंतू जिंकवून देऊ शकले नाहीत.
Web Title: IPL 2021: mistake was made! Punjab Kings select aiden markram and not playing chris gayle
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.