IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) सहाय्यक प्रशिक्षक मोहम्मद कैफ यांनी त्यांचा संघ चेन्नईच्या धीम्या खेळपट्टीवर फिरकीपटूंचा कसा सामना करतो हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार असल्याचं सांगितलं आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध मिळालेल्या विजयानंतर दिल्लीच्या संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे हाच आत्मविश्वास सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यातही कायम ठेवण्याचा दिल्लीचा प्रयत्न असणार आहे. "आमचे फलंदाज हैदराबादच्या राशिद खानच्या फिरकीचा चेन्नईच्या फिरकीला पोषक खेळपट्टीवर कसा सामना करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे", असं मोहम्मद कैफ म्हणाले. (IPL 2021 mohammed kaif says how we play rashid khan will hold key delhi capitals sunrisers hyderabad)
IPL 2021: धोनीनं जडेजावर सोपवली मोठी जबाबदारी; आज मॅक्सवेल मैदनात येताच होणार खेळ खल्लास!
चेन्नईच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणं कठीण जात आहे. पण संघातील अनुभवी फलंदाज चांगल्या फॉर्मात आहेत, असंही कैफ म्हणाले. "शिखर धवन खूप चांगली फलंदाजी करत आहे आणि स्टीव्ह स्मिथनंही गेल्या सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. अमित मिश्रानं गेल्या सामन्यात जबरदस्त गोलंदाजी आणि आमच्याकडे आर.अश्विन देखील आहे. मार्कस स्टॉयनिसनं गेल्या सामन्यात नव्या चेंडूनं चांगला मारा केला. त्यामुळे फिरकीला पोषक खेळपट्टीवरही आमचा संघ अव्वल कामगिरी करेल", असं मोहम्मद कैफ म्हणाले.
अक्षर पटेलचं पुनरागमनदिल्लीचा फिरकीपटू अक्षर पटेल कोरोनाग्रस्त झाल्यानं संघाबाहेर आहे. पण आता तोही पूर्णपणे फिट झाल्याची माहिती समोर आली आहे. "दिल्ली कॅपिटल्सचा संघ सध्या संतुलित संघ आहे. अक्षर पटेल देखील संघाचा महत्वपूर्ण खेळाडू आहे. गेल्या सीझनमध्ये दिल्लीच्या संघाला फायनलपर्यंत घेऊन जाण्यात महत्वाची भूमिका पार पाडली होती. अक्षर, मिश्रा आणि अश्विन यांनी एकत्र खेळणं आमच्यासाठी स्वप्नवत ठरेल", असं कैफ म्हणाले.