लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन शतकी खेळी पाहण्यास मिळाल्या. संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्सकडून यंदाचे पहिले शतक ठोकले, मात्र यानंतरही त्याच्या संघाला थोडक्यात पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर यंदाच्या सत्रातील दुसरे शतक गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाकडून आले. युवा फलंदाज देवदत्त पडिक्कल याने शानदार नाबाद शतक झळकावून आरसीबीला राजस्थानविरुद्ध सहज विजय मिळवून दिला. या निमित्ताने आरसीबीने आयपीएल इतिहासात सर्वाधिक शतके झळकावण्याचा पराक्रम केला असून स्पर्धा इतिहासात आतापर्यंत एकूण ६३ शतकांची नोंद झाली आहे. मुंबई इंडियन्सला रोखण्यासाठी पंजाब किंग्सनं नवा खेळाडू मैदानावर उतरवला!
देवदत्त यंदाच्या आयपीएलमध्ये शतक झळकावणारा दुसरा फलंदाज ठरला. त्याने ५१ चेंडूंत ११ चौकार व ६ षटकारांसह धमाकेदार खेळी केली. या निमित्ताने आरसीबीने आयपीएल इतिहासात सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम रचला. आरसीबीने एकूण १४ शतके झळकावली असून यावेळी त्यांनी १३ शतके झळकावलेल्या पंजाब किंग्ज संघाला मागे टाकले. तिसऱ्या स्थानी दिल्ली कॅपिटल्स असून त्यांनी १० शतके झळकावली आहेत. पण गंमत म्हणजे, सर्वाधिक शतके झळकावणाºया अव्वल तीन संघांना अद्याप एकदाही आयपीएल जेतेपद पटकावता आलेले नाही. राजस्थान रॉयल्सवर मोठ संकट कोसळलं; प्रमुख गोलंदाजानं आयपीएलमधून माघार घेतली
जेतेपदासाठी सांघिक खेळ अत्यंत महत्त्वाच ठरतो आणि हेच सिद्ध केले आहे ते चॅम्पियन मुंबई इंडियन्सने. मुंबईकडून आतापर्यंत केवळ ४ वैयक्तिक शतके झळकावली आहेत. मात्र, कोणा एका खेळाडूवर विसंबून न राहणाऱ्या मुंबईने एक नाही, दोन नाही, तर तब्बल पाचवेळा आयपीएल जेतेपदावर कब्जा केला आहे. लॉकडाऊनमध्ये घर बसल्या बक्षीस जिंकण्याची संधी
महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जनेही सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना तीन वेळा जेतेपद उंचावले. सीएसकेने आतापर्यंत ८ वेळा वैयक्तिक शतके झळकावली आहेत. चेन्नईचा माजी अष्टपैलू शेन वॉटसन यानेच एकट्याने तब्बल ४ शतके झळकावली आहेत.