IPL 2021, Chennai Super Kings in Final : महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) पुन्हा एकदा मॅच फिनिशरच्या रुपात दिसला अन् त्याच्या फॅन्सला प्रचंड आनंद झाला. धोनीनं चेन्नई सुपर किंग्ससाठी जेव्हा विजयी चौकार खेचला तेव्हा दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर भावनिक लाट पसरली. स्टेडियममध्ये, टीव्हीसमोर उभे असलेले CSK फॅन्स आनंदी झालेच, शिवाय हे गहिवरलेही... त्यामुळेच त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. कॅप्टन कूलची पत्नी साक्षी हिलाही भावनांवर संयम ठेवता आला नाही आणि तिलाही रडू आवरले नाही. हे सर्व आनंदमयी वातावरण असताना दिल्ली कॅपिटल्सच्या ( DC) डाव सुरू असताना धोनीची एक कृती सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि #fixerkings हा ट्रेंड सुरू झाला...
दिल्ली कॅपिटल्सनं पृथ्वी शॉ ( ३४ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ६० धावा), शिमरोन हेटमायर (३७ धावा) आणि रिषभ पंत ( ३५ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह नाबाद ५१ धावा) यांच्या खेळीच्या जोरावर ५ बाद १७२ धावा केल्या. प्रत्युत्तरात रॉबीन उथप्पा ( ६३) व ऋतुराज गायकवाड ( ७०) यांच्या ११० धावांच्या भागीदारी नंतर महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) ६ चेंडूंत ३ चौकार व १ षटकार खेचून नाबाद १८ धावा करताना चेन्नईला फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला. चेन्नईला अखेरच्या षटकात १३ धावा हव्या होत्या. टॉम कुरनच्या षटकात धोनीनं तीन खणखणीत चौकार खेचले. चेन्नईनं ४ विकेट्स राखून हा सामना जिंकला.
दिल्लीच्या डावातील शार्दूल ठाकूरनं टाकलेल्या १६व्या षटकात रिषभ पंत स्ट्राईकवर असताना अम्पायरनं ६वा चेंडू wide दिला. तो ऑफ साईडला बराच बाहेर जात होताच आणि अम्पायरनं निर्णय दिला. शार्दूलला या निर्णयावर काही खूश दिसला नाही आणि ते षटक संपताच महेंद्रसिंग धोनीनंही अम्पायरकडे त्या निर्णयाचा जाब विचारला. धोनीचे ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मागील पर्वात धोनीचा रुद्रावतार पाहून अम्पायर Wide निर्णय देता देता थांबले होते आणि आता कालच्या सामन्यातील कृतीनं #fixerkings हा ट्रेंड सुरू झाला. या सामन्यात चेन्नईच्या खेळाडूंकडूनही क्षेत्ररक्षणात अक्षम्य चुका झाल्या.
पाहा नेटिझन्स काय म्हणातात...
Web Title: IPL 2021 : MS Dhoni show disappointment on umpire wide called decision, Fixerkings trend started on social media
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.