इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाला ( IPL 2021) सोमवारी मोठे धक्के बसले. कोलकाता नाईट रायडर्सपासून ( Kolkata Knight Riders) सुरू झालेला कोरोनाचा प्रवास चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) ताफ्यात जाऊन धडकला. त्यानंतर नवी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवरील पाच कर्मचाऱ्यांनाही कोरोना झाल्याचे वृत्त समोर आले. KKRचे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ( Royal Challengers Banglore) संघानं आजचा सामना खेळण्यास नकार दिला आणि त्यामुळे बीसीसीआयला आजची KKR vs RCBलढत स्थगित करावी लागली. आता मंगळवारी व बुधवारी होणाऱ्या सामन्यांवरही अनिश्चिततेचं सावट आहे. नवी दिल्लीत मंगळवारी सनरायझर्स हैदराबाद वि. MI आणि बुधवारी दिल्लीतच राजस्थान रॉयल्स वि. CSK अशा लढती होणार आहेत. बीसीसीआयनं ७००-८०० कोटींची मदत करायला हवी, भारतीयांचे ऋण फेडण्याची हीच ती वेळ - ललित मोदी
KKRच्या संघातील वरूण चक्रवर्थी व संदीप वॉरियर्स या दोन खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या दोघांनाही विलगीकरणात ठेवले आहे. KKRच्या सर्व सदस्यांना ६ दिवसांच्या सक्तिच्या विलगीकरणात राहण्याचे आदेश दिले गेले आहेत. त्यामुळे आता या खेळाडूंच्या तीन कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येईपर्यंत त्यांना मैदानावर उतरता येणार नाही. KKRप्रमाणे CSKचे CEO कासी विश्वनाथन, गोलंदाज प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी व बस क्लिनर यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या कोटला मैदानावर आयपीएलचे सामने होत आहेत आणि त्या स्टेडियमवर काम करणाऱ्या पाच ग्राऊंड्समनचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त आहे. वरुण चक्रवर्थीची एक चूक IPL 2021ला महागात पडणार; तरीही खेळला होता दिल्लीविरुद्धचा सामना?
चेन्नई सुपर किंग्सचा मागील सामना मुंबई इंडियन्ससोबत झाला होता. त्यामुळे जर CSKचा लक्ष्मीपती बालाजी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व खेळाडूंना सहा दिवसांच्या विलगीकरणात जाणं भाग आहे, तोच नियम मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनाही लागू होईल. IPLच्या नियमानुसार आता या दोन्ही संघांना सहा दिवसांच्या विलगीकरणात जावं लागेल आणि तीनवेळा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना पुन्हा मैदानावर उतरता येईल. दोन खेळाडूंसह १० जणांना कोरोना; IPLच्या पुढील सामन्यांबाबत BCCIकडून महत्त्वाचे अपडेट्स!
पण, याबाबतीत BCCI काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर बीसीसीआयनं हा नियम MI व CSKच्या खेळाडूंसाठी लागू केल्यास. पुढील दोन दिवसही आयपीएलचे सामने होण्याची शक्यता कमी आहे. पॅट कमिन्सनं PM Cares Fundला पैसे देण्याचा निर्णय घेतला मागे; पण, भारताला मदतीचं वचन कायम!