Join us  

IPL 2021: मुंबई इंडियन्सचा मराठी बाणा! गुढीपाडव्याच्या मराठीतून शुभेच्छा देत आनंद केला द्वीगुणीत, पाहा VIDEO

कर्णधार रोहित शर्मासह मुंबईच्या मराठमोळ्या क्रिकेटपटूंनी गुढीपाडव्याच्या मराठीतून शुभेच्छा देत सर्वांना खूश केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 2:05 PM

Open in App

IPL 2021, Mumbai Indians: देशावर कोरोनाचे संकट असले तरी याचा फारसा परिणाम सण-उत्सवांवर झाल्याचे दिसून येत नाही. सोशल डीस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझेशन अशा गोष्टींची काळजी घेत देशभरात मंगळवारी गुढीपाडवा आणि नवीन वर्षाचा आनंद साजरा करण्यात आला. यामध्ये सर्वांच्या आनंदात भर टाकली ती आयपीएलचा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्सने. कर्णधार रोहित शर्मासह मुंबईच्या मराठमोळ्या क्रिकेटपटूंनी गुढीपाडव्याच्या मराठीतून शुभेच्छा देत सर्वांना खूश केले.

 मंगळवारीच मुंबई इंडियन्स संघ आपल्या दुसऱ्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध भिडेल. पहिल्या लढतील रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध निसटता पराभव पत्करावा लागल्यानंतर मुंबईकर आता विजयी गुढी उभारण्यास सज्ज झाले आहेत. मात्र त्याआधी आपल्या चाहत्यांसोबत गुढीपाडवा आणि नवीन वर्षाचा आनंद साजरा करत मुंबईच्या क्रिकेटपटूंनी वातावरण प्रसन्न केले.

मुंबई इंडियन्स संघ व्यवस्थापनाने आपल्या सर्व सोशल मीडीयावर अकाऊंट्सवर हा हटके व्हिडिओ टाकून चाहत्यांना सुखद धक्का दिला. मुंबई इंडियन्सने अनेकदा मराठीतून सोशल मीडियावर संवाद साधताना महाराष्ट्राशी नाते कायम जुळले आहे. त्यात कर्णधार रोहित शर्मानेही अनेकदा आयपीएल आणि भारताकडून खेळताना मराठीतून संवाद साधले आहे.

त्यामुळेच नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स संघातील मराठमोठे वातावरण दिसून आले. मुंबई इंडियन्सने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी, दिग्गज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर, अनुभवी यष्टिरक्षक आदित्य तरे, गोलंदाजी प्रशिक्षक झहीर खान, स्टार फलंदाज सूर्यकुमार यांच्यासोबतीला हार्दिक पांड्या यानेही मराठीतून आपल्या चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

त्याचवेळी, अनेकांनी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर कॅप्टन रोहित शर्माची कमेंट ठेवल्याचे दिसून आले. ‘माझ्याकडून आणि मुंबई इंडियन्सकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा,’ असे रोहितने यामध्ये म्हटले आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंसह गुढीपाडव्याचा आनंद साजरा केल्याचे दिसून आले. 

टॅग्स :मुंबई इंडियन्सगुढीपाडवा २०१८आयपीएल २०२१रोहित शर्माहार्दिक पांड्यासूर्यकुमार अशोक यादव