IPL 2021 : मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians) संघ सालाबादाप्रमाणे यंदाही जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मागील आठ वर्षांत मुंबई इंडियन्सनं ( MI) रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली आयपीएलची पाच जेतेपद पटकावली आहेत. कोरोना व्हायरसमुळे यंदा मुंबई इंडियन्सला वानखेडे स्टेडियमवर एकही सामना खेळण्यास मिळणार नसला तरी MIचं बाजी मारणार, असा दावा चाहत्यांकडून केला जात आहे. सध्या मुंबईचा संघ चेन्नईत आहे आणि ९ एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) विरुद्ध ते सलामीचा सामना खेळतील. तेथेही त्यांचा राजेशाही थाट पाहायला मिळत आहे. सूर्यकुमार यादवनं (Mumbai Indians Team room tour with Suryakumar Yadav) चेन्नईतील MIच्या आलीशान टीम रूमची सफर घडवून आणली. सुरेश रैनाची माघार ते सुनील गावस्कर यांची अनुष्का शर्मावरील वादग्रस्त कमेंट; IPL 2020मधील मोठे वाद!
सलग तिसऱ्यांदा आयपीएल जेतेपद पटकावण्याची संधीIndian Premier League च्या इतिहासात सलग तीनवेळा जेतेपद पटकावण्याची संधी मुंबई इंडियन्सला आहे. आतापर्यंत एकाही संघाला हा पराक्रम करता आलेला नाही. MI नं २०१९ व २०२०मध्ये अनुक्रमे चेन्नई सुपर किंग्स ( CSK) व दिल्ली कॅपिटल्सा ( DC) यांच्यावर विजय मिळवून आयपीएल जेतेपदं नावावर केली होती. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं ( MI) पाच जेतेपद पटकावली आहे. चेन्नई सुपर किंग्सनं तीन वेळा, तर कोलकाता नाइट रायडर्सनं दोन वेळा ही कामगिरी केली आहे. प्रथमच खेळताना 'हे' खेळाडू दम दाखवणार; आयपीएलच्या १४व्या पर्वाची संपूर्ण माहिती एका क्लिकवर मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians full squad ) - रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जयंत यादव, कीरोन पोलार्ड, क्रु णाल पंड्या, अनुकूल रॉय, इशान किशन, क्विंटन डी कॉक आदित्य तारे, धवल कुलकर्णी, जयंत यादव, क्रि स लिन, मोहसिन खान आणि अनमोलप्रीत सिंग, नॅथन कोल्टर नायर, अॅडम मिल्ने, पीयूष चावला, जिमी निशम, युधवीर चरक, मार्को जॅन्सेन, अर्जुन तेंडुलकर.
पाहा व्हिडीओ...