IPL 2021: भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आयपीएलमधील काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. पण न्यूझीलंडच्या खेळाडूंनी भारतात कोरोनाचं संकट वाढत असलं तरी भारतातच राहण्याचा पवित्रा घेतला आहे. न्यूझीलंडच्या क्रिकेट असोसिएशनचे मुख्य अधिकारी हेथ मिल्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, आशियाई देशांमध्ये कोरोनाचं संकट वाढत असलं तरी आयपीएलमध्ये सहभागी असलेले न्यूझीलंडचे खेळाडू स्पर्धा खेळणार आहेत. आयपीएलमध्ये सध्या केन विल्यमसन, लॉकी फर्ग्युसन आणि ट्रेंट बोल्ट या न्यूझीलंडच्या मुख्य खेळाडूंसोबत इतरही काही खेळाडू खेळत आहेत. (IPL 2021 New Zealand cricketers to stay back in India despite COVID 19 scares)
मोदी बेजबाबदार! IPL थांबवा अन् कोरोनाकडे लक्ष द्या, ब्रिटनच्या पत्रकाराची रोखठोक टीका
आयपीएल स्पर्धेसाठी बीसीसीआयनं नियोजित केलेल्या बायो बबल सुरक्षेमुळे खेळाडूंना कोरोना व्हायरसची कोणतीही भीती नाही, असा विश्वास मिल्स यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, एका शहरातून दुसऱ्या शहरात जाताना थोडाफार धोका आहे. पण त्याबाबतही काळजी बाळगली जात आहे, असंही मिल्स म्हणाले.
IPL 2021: ३७ चेंडूत ठोकलेलं शतक, विराट कोहली या विस्फोटक फलंदाजाला का खेळवत नाही?
"भारतात सध्या कोरोनाचं संकट वाढत आहे हे खरं असलं तरी आयपीएल फ्रँचायझींकडून खेळाडूंची योग्य ती काळजी आणि सुरक्षा बाळगली जात आहे. सर्व खेळाडू बायो बबलच्या सुरक्षा कवचामध्ये आहेत", असं हेथ मिल्स यांनी सांगितलं.
"एका हॉटेलमध्ये चार संघ थांबले आहेत आणि हॉटेल पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. फक्त खेळाडूंना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करताना आव्हानात्मक आहे. यावेळी खेळाडूंना पीपीई कीट परिधान करुन प्रवास करावा लागत आहे. यासर्व नियमांचं न्यूझीलंडचे क्रिकेटपटू पालन करत आहेत आणि त्यातील एकानंही अद्याप मायदेशी परतण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही", असं हेथ मिल्स म्हणाले.
डेव्हिड वॉर्नर, स्मिथही IPL मधून माघार घेण्याची शक्यता, ऑस्ट्रेलियामध्ये एन्ट्री बंद होण्याची भीती
दरम्यान, आयपीएल संपल्यानंतर न्यूझीलंडचा संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे आयपीएल संपल्यावर मायदेशी परतल्यानंतर क्वारंटाइन नियमांचं पालन करावं लागणार आहे आणि त्यानंतर इंग्लंडला रवाना व्हावं लागणार आहे. तेथेही क्वारंटाइनच्या नियमांचं पालन खेळाडूंना करावं लागेल. या सर्व कालावधीत बराच वेळ जाणार असल्यानं दौऱ्याच्या वेळापत्रकावर याचा परिणाम होणार आहे. या समस्येबाबत न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड, बीसीसीआय आणि आयसीसीसोबत चर्चा सुरू असल्याचं मिल्स यांनी सांगितलं.