Indian Premier League 2021 : आयपीलच्या १४व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाच्या ताफ्यात चिंतेचं वातावरण होतं. त्यांचा प्रमुख फलंदाज नितीश राणा ( Nitish Rana) याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळला होता. पण, क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतरच्या चाचणीत त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि आता त्यानं खेळाडूंसोबत सरावाला सुरुवात केली आहे. २७ वर्षीय नितीश राणा २१ मार्चला मुंबईत दाखल झाला आणि दुसऱ्या दिवशी त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होत. त्यानंतर तो हॉटेल रुममध्ये आयसोलेशनमध्ये होता. महेंद्रसिंग धोनीचा खणखणीत षटकार, भावनिक झालेला सचिन तेंडुलकर अन् जगावर फडकला तिरंगा!
KKR नं गुरुवारी अधिकृत प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं आणि त्यात लिहिलं की,''नितीश राणा २१ मार्चला KKR टीमच्या हॉटेलमध्ये पोहोचला आणि त्याच्याकडे १९ मार्चचा कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट होता आणि २२ मार्चला त्याची पुन्हा कोरोना चाचणी झाली व त्यात रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्याच्यात कोरोनाची कोणतीच लक्षणं दिसत नव्हती. त्यानंतर तो क्वारंटाईन झाला होता आणि पुन्हा चाचणी झाली. आम्हाला हे सांगण्यात आनंद होतोय की, त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तो लवकरच खेळाडूंसोबत सरावाला सुरुवात करेल.'' Anand Mahindra : आनंद महिंद्रांनी मुंबईकर शार्दूल ठाकूरला गिफ्ट केली 'Mahindra Thar'!
आयपीएलचे १४वे पर्व ९ एप्रिलपासून सुरू होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सलामीचा सामना होईल. कोलकाता नाइट रायडर्सचा पहिला सामना ११ एप्रिलला सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध होणार आहे. नितीश राणानं २०२०च्या आयपीएलमध्ये १४ सामन्यांत २५४ धावा कुटल्या होत्या. त्यानं आतापर्यंत आयपीएलच्या ६० सामन्यांत १४३७ धावा केल्या आहेत आणि त्याचा स्ट्राईक रेट हा १३५.५६ इतका आहे. नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत नितीशनं ७ सामन्यांत ६६.३३च्या सरासरीनं ३९८ धावा चोपल्या. त्यात एक शतक व दोन अर्धशतकांचा समावेश होता.
KKR चे सर्व खेळाडू ताफ्यात दाखल झाले असून त्यांनी सरावालाही सुरुवात केली आहे. शुबमन गिल, कमलेश नागरकोटी व शिवम मावी यांचे सराव करतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. आंद्रे रसेल, कर्णधार इयॉन मॉर्गन, दिनेश कार्तिक व सुनील नरीन हेही सराव करताना दिसत आहेत.
कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) - शुबमन गिल, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, नीतीश राणा, सुनील नरेन, कुलदीप यादव, हैरी गर्नी, लोकी फर्ग्यूसन, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, पॅट कमिन्स इयोन मोर्गन, वरुण चक्र वर्ती, सिद्ध कृष्ण, रिंकूसिंग, संदीप वॉरियर, निखिल नाईक, राहुल त्रिपाठी, शकिब अल हसन, शेल्डन जॅक्सन, वैभव अरोरा, करुण नायर, हरभजन सिंग, बेन कटींग, वेंकटेश अय्यर, पवन नेगी.