Join us

IPL 2021 : आमच्या संघात आरोप-प्रत्यारोप होत नाही - संगकारा

फलंदाजीतील खराब कामगिरीमुळे राजस्थानला बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध पराभव पत्करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 09:52 IST

Open in App
ठळक मुद्दे फलंदाजीतील खराब कामगिरीमुळे राजस्थानला बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध पराभव पत्करावा लागला.

दुबई : ‘खेळामध्ये जय-पराजय होतच असतात. यासाठी कोणाला जबाबदार ठरविणे मला योग्य वाटत नाही. आम्ही एकत्र खेळतो, एकत्र जिंकतो आणि एकत्रच हरतोही. आमच्या संघात आरोप-प्रत्यारोप होत नाही,’ अशी प्रतिक्रिया राजस्थान रॉयल्सचे निर्देशक कुमार संगकारा यांनी दिली. फलंदाजीतील खराब कामगिरीमुळे राजस्थानला बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध पराभव पत्करावा लागला.

सामन्यानंतर संगकारा म्हणाले की, ‘आरसीबीविरुद्ध आम्ही चांगला खेळ केला नाही आणि सर्वांना याची जाणीव आहे. आम्ही कोणतीही किचकट योजना न आखता, सोप्या पद्धतीने खेळावर लक्ष केंद्रित करतो. योजनेनुसार खेळ व्हावा, असाच आमचा प्रयत्न असतो.’

संगकारा यांनी पुढे सांगितले की, ‘संघावर अतिरिक्त दबाव टाकण्याचे माझे काम नसून, दबावातून कसे बाहेर निघावे आणि त्यातून कसा सर्वोत्तम खेळ करावा हे सांगणे आहे. संजू सॅमसन चांगल्या प्रकारे नेतृत्व करत असून, आम्ही सातत्याने चर्चा करत असतो. तो अत्यंत गुणवान खेळाडू असून, यंदाच्या सत्रात त्याने चांगला खेळ केला आहे.’

टॅग्स :आयपीएल २०२१कुमार संगकाराराजस्थान रॉयल्स
Open in App