IPL 2021: देशात कोरोना रुग्णवाढ अद्याप कायम असून आज साडेतीन लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचं संकट वाढत असतानाच देशात आयपीएल स्पर्धा देखील सुरू आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धेवरही कोरोनाचं सावट निर्माण झालं आहे. त्यात भारतातील कोरोना रुग्णवाढ पाहून परदेशी खेळाडू स्पर्धेतून माघार घेत असल्यानं संघांसमोरील आणि पर्यायानं बीसीसीआयसमोरील अडचणी वाढत आहेत. अशात आता बीसीसीआयनं खेळाडूंसाठीचे नियम आणखी कडक केले आहेत. (IPL 2021 No outside food more frequent testing and Indian players to get vaccinated)
IPL 2021: 'होय, आम्ही बिथरलोय', रिकी पाँटिंगचं भारतातील कोरोना वाढीवर मोठं विधान!
आयपीएल स्पर्धा रद्द करण्याची मागणी होत असताना बीसीसीआय मात्र नियोजित वेळापत्रकानुसारच स्पर्धा पूर्ण होईल यावर ठाम आहे. त्यासोबत सर्व खेळाडूंची जबाबदारी देखील बीसीसीआयनं स्वीकारली आहे. आयपीएलमध्ये सहभागी असलेले सर्व खेळाडू आणि सहकाही बायो-बबलच्या नियमांचं पालन करत आहेत. आयपीएल व्यवस्थापनाकडून नियम आता आणखी कडक करण्यात आले आहेत.
IPL 2021: आयपीएल म्हणजे मनोरंजन नाही!, स्पर्धा रद्द करावी की नाही? भारतीय गोलंदाजानं रोखठोक सांगितलं...
"बायो बबल"मध्ये असलेल्या सर्व खेळाडूंची आता दर दोन दिवसांनी कोरोना चाचणी केली जाणार आहे. याआधी दर पाच दिवसांनी खेळाडूंची कोरोना चाचणी केली जात होती. याशिवाय कोणत्याही खेळाडूला आता बाहेरुन खाणं मागवता येणार नाहीय. म्हणजेच खेळाडू ज्या हॉटेलमध्ये वास्तव्याला आहेत. त्या हॉटेलच्या बाहेरुन खाणं मागवण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती बीसीसीआयचे सीईओ हेमंग आमीन यांनी सांगितलं. याआधी खेळाडूंना हॉटेलबाहेरुन खाणं मागवण्याची परवानगी होती.
रिषभ पंतवर वीरेंद्र सेहवाग संतापला, १० पैकी दिले फक्त ३ गुण!
बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या १ मे पासून आयपीएलमधील सहभागी सर्व भारतीय खेळाडूंना लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. लस घ्यावी की नाही याचा निर्णय सर्वस्वी खेळाडूंवर राहणार आहे.
IPL 2021चं बायो बबल सर्वात असुरक्षित, परिस्थिती खूपच भयानक; अॅडम झम्पानं सांगितलं माघार घेण्यामागचं कारण
आयपीएलचं यंदाचं १४ वं सीझन सुरू असून स्पर्धा एकूण ७ आठवडे चालणार आहे. ९ एप्रिलपासून स्पर्धेला सुरुवात झाली असून अंतिम सामना ३० मे रोजी होणार आहे. सध्या गुणतालिकेत रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा संघ अव्वल स्थानावर आहे.
Web Title: IPL 2021 No outside food more frequent testing and Indian players to get vaccinated
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.