नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या बेसुमार वेगाने वाढत आहे. काही ठिकाणी लॉकडाऊनसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ९ एप्रिलपासून सुरू होत असलेल्या आयपीएलच्या आयोजनाबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयचे प्रमुख सौरव गांगुली यांनी आयपीएलबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. ( Number of corona patients increases in the India, BCCI chief Sourav Ganguly makes important announcement about IPL2021)
एएनआय या वृत्तसंसंस्थेशी बोलताना सौरव गांगुली यांनी आयपीएलच्या आयोजनाबाबत माहिती दिली आहे. गांगुली यांनी सांगितले की, ९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या नव्या हंगामाचे आयोजन हे वेळापत्रकाप्रमाणे होणार आहे. महाराष्ट्र सरकारने कोरोनाला रोखण्यासाठी जाहीर केलेल्या विकेंड लॉकडाऊननंतर गांगुली यांनी ही माहिती दिली आहे.
दरम्यान, मुंबईत लॉकडाऊन लागले तरी क्रिकेटचे सामने वेळापत्रकाप्रमाणे आयोजित होतील, असे सौरव गांगुली यांनी स्पष्ट केले. ते टेलिग्राफशी संवाद साधताना म्हणाले की, लॉकडाऊन लागल्यास ते चांगलेच असेल. आजूबाजूला अधिक लोक नसतील. बायो बबलमध्ये नसलेल्या काही मोजक्याच लोकांवर लक्ष द्यावे लागेल. जे बायोबबलमध्ये आहेत त्यांची सातत्याने चाचणी होत आहे. जेव्हा तुम्ही बायो बबलमध्ये जाता तेव्हा काही होत नाही. गेल्या वर्षी यूएईमध्ये आयपीएल होत असताना अशा काही घटना घडल्या होत्या. मात्र एकदा स्पर्धा सुरू झाली की, सर्व काही सुरळीत होईल.
Web Title: IPL 2021: Number of corona patients increases in the India, Sourav Ganguly makes important announcement about IPL
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.