Join us

IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्सलाही लागलं 'कोरोना'चं ग्रहण, संघातील सदस्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL) १३व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings)  दोन खेळाडूंसह १३ सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 15:11 IST

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL) १३व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings)  दोन खेळाडूंसह १३ सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर CSKची कामगिरी कशी झाली हे सर्वांना माहितच आहे. ते सर्व विसरून आयपीएल २०२१ ( IPL 2021) नव्या दमानं मैदानावर उतरलेल्या CSKला शनिवारी मोठा धक्का बसला. त्यांच्या ताफ्यातील एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. पण, हा सदस्य खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफच्या कोणत्याची सदस्याशी संपर्कात आला नसल्याचे, CSKच्या सूत्रांनी सांगितले. IPL 2021 : नितीश राणा, वानखेडेवरील ८ कर्मचारी अन् आता दिल्ली कॅपिटल्सचा प्रमुख खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह!

चेन्नई सुपर किंग्स १० एप्रिलला आयपीएलमधील पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर खेळणार आहे. ''CSKच्या कंटेन्ट टीममधील एक सदस्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आजच त्याचा रिपोर्ट आला आणि त्याला संपूर्ण संघापासून दूर आयसोलेट केले गेले आहे. तो खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफमधील कोणत्याची सदस्याच्या जवळ गेला नव्हता. त्यामुळे अन्य सर्वजण सुरक्षित आहेत,''असे सूत्रांनी TOI ला सांगितले. सचिन तेंडुलकरच्या प्रकृतीबाबत आली मोठी बातमी, बालपणीच्या मित्रानं दिली महत्त्वाची माहिती

चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) - महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, केएम आसिफ, इमरान ताहिर, कर्ण शर्मा, मिशेल सैंटनर, आर. साई किशोर, लुंगी एनगिडी, रवींद्र जडेजा, नारायण जगदीशन, ऋतुराज गायकवाड़, जोश हेजलवुड, अंबाती रायडू, दीपक चाहर, फाफ डु प्लेसिस, शार्दूल ठाकुर, ड्वेन ब्राव्हो आणि सॅम कुरेन, मोईन अली, के गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा, हरि निशांत.

टॅग्स :आयपीएलचेन्नई सुपर किंग्सबीसीसीआयकोरोना वायरस बातम्या