ऑस्ट्रेलियाचा व कोलकाता नाईट रायडर्सचा गोलंदाज पॅट कमिन्स ( Pat Cummins) यानं सोमवारी एक ट्विट केलं. त्यात त्यानं आपण भारताच्या कोरोना लढ्यात मदत करण्यासाठी देण्यात येणारी रक्कम ही UNICEF ऑस्ट्रेलियाला दान करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी पॅट कमिन्सनं ५० हजार डॉलर ही रक्कम PM Care Fundला दान करणार असल्याची घोषणा केली होती, परंतु आता तो ही रक्कम UNICEF ऑस्ट्रेलियाला देणार आहे. ( Pat Cummins donated his money of $50,000 to UNICEF Australia's India crises)
भारत संकटात असताना ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं मदतीचा हात पुढे केला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्श असोसिएशन आणि यूनिसेफ ऑस्ट्रेलियाकडून भारताला कोरोना लढ्यात सहकार्य म्हणून आर्थिक मदत जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं प्रारंभिक रुपात ५० हजार डॉलर म्हणजेच जवळपास ३७ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याशिवाय त्यांनी इतरांनाही मदत करण्याचं आवाहन केलं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या पुढाकाराला पॅट कमिन्सनं साथ दिली.
कमिन्सनं ट्विट केलं की, कौतुकास्पद कार्य. मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की, मी आधी जाहीर केलेली रक्कम ही UNICEF ऑस्ट्रेलियाच्या माध्यमातून भारताच्या कोरोना लढ्यासाठी दान करत आहे. तुम्हाला शक्य असेल, तर तुम्हीही पुढाकार घ्या अन् मदत करा.
काय म्हणाला होता कमिन्स?''एक खेळाडू म्हणून माझीही काही जबाबदारी आहे आणि मी PM Cares Fund साठी काही निधी दान करत आहे, विशेषकरून भारतातील हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनच्या खरेदीसाठी हा निधी असेल. आयपीएलमधील मी माझ्या सहकाऱ्यांनाही मदतीचं आवाहन करतो,''असे तो म्हणाला होता.
पॅट कमिन्स विलगीकरणात कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघातील फिरकीपटू वरुण चक्रवर्थी, संदीप वॉरियर यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासोबत पॅट कमिन्सची तब्येत बिघडल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे तोही विलगीकरणात आहे.