Join us  

IPL 2021, RCB vs PBKS Live Updates : तिसऱ्या अम्पायरचा वादग्रस्त निर्णय; लोकेश राहुलचा पारा चढला, पंचांना बोट दाखवून जाब विचारला, Video

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) व पंजाब किंग्स ( PBKS) यांच्यातल्या शारजा येथे सुरू असलेल्या सामन्यात वादग्रस्त निर्णय दिला गेला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2021 4:22 PM

Open in App

IPL 2021, Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) व पंजाब किंग्स ( PBKS) यांच्यातल्या शारजा येथे सुरू असलेल्या सामन्यात वादग्रस्त निर्णय दिला गेला. बंगलोरचा सलामीवीर देवदत्त पडिक्कल बाद असल्याचे रिप्लेत दिसत असूनही तिसऱ्या अम्पायरनं त्याला नाबाद दिले. त्यानिर्णयानंतर पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल याचा पारा चढला अन् त्यानं मैदानावरील अम्पायरला जाब विचारला. 

RCBचा कर्णधार विराट कोहली यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शारजाह येथील खेळपट्टी दुसऱ्या टप्प्यात संथ होते आणि त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे विराटनं सांगितले. विराट व देवदत्त पडिक्कल यांनी RCBला चांगली सुरुवात करून देताना पॉवर प्लेत ५५ धावा कुटल्या. त्यानंतर PBKSचा कर्णधार लोकेश राहुलनं फिरकी गोलंदाजांना पाचरण केलं. हरप्रीत ब्रारनं ७व्या षटकात दोन धावा दिल्या आणि रवी बिश्नोईनं ८व्या षटकात ४थ्या चेंडूवर पडिक्कलची विकेट घेतलीच होती. 

पडिक्कलचा बिश्नोईच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न फसला अन् चेंडू यष्टीरक्षक लोकेश राहुलच्या हाती विसावला. त्यानंतर लोकेशनं जोरदार अपील केले आणि मैदानावरील पंचांनी नाबाद निर्णय दिला. त्याविरोधात लोकेश लगेच तिसऱ्या पंचाकडे गेला. त्याच चेंडू पडिक्कलच्या ग्लोव्हजला घासल्याचे स्पष्ट दिसत होते, परंतु तिसऱ्या अम्पायरनंही पडिक्कलला नाबाद दिले अन् लोकेशचा पारा चढला.

पाहा व्हिडीओ आयपीएलच्या यंदाच्या पर्वासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज संघ प्रत्येकी १८ गुणांसह प्ले-ऑफसाठी पात्र झाले आहेत. आता तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी इतर संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे. यात बंगलोर आणि पंजाबच्या संघात मोठी चुरस पाहायला मिळू शकते. आजचा सामना जिंकून दोन्ही संघांना आपलं स्थान बळकट करता येणार आहे. बंगलोरला आजचा सामना जिंकून १६ गुणांपर्यंत मजल मारता येईल. तर पंबाजला सामना जिंकून स्पर्धेतील आपलं आव्हान कायम ठेवता येणार आहे. पंजाबनं आजचा सामना जिंकला तर त्यांना १२ गुणांसह चौथं स्थान प्राप्त करता येणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB):विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, केएस भरत, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, डॅनियल ख्रिश्चन, युजवेंद्र चहल, शाहबाज अहमद, जॉर्ज गार्टन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज 

पंजाब किंग्ज (PBKS):केएल राहुल (कर्णधार), मयांक अग्रवाल, मार्करम, निकोलस पुरन, सरफराज खान, शाहरुख खान, मोईसेस हेन्रिक्स, हरप्रित ब्रार, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, अर्शदिप सिंग 

टॅग्स :आयपीएल २०२१लोकेश राहुलरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरपंजाब किंग्स
Open in App