ipl 2021 t20 PBKS vs DC live match score updates Ahmedabad : मयांक अग्रवालच्या नाबाद ९९ धावांच्या खेळीवर शिखर धवनच्या नाबाद ६९ धावा भारी पडल्या. दिल्ली कॅपिटल्सनं ( Delhi Capitals) रविवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सवर ( Punjab Kings) ७ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. पंजाबकडून मयांक एकटा खेळला, तर धवनला पृथ्वी शॉ, स्टीव्ह स्मिथ या सहकाऱ्यांची साथ मिळाली. म्हणून दिल्लीनं हा विजय मिळवला. लोकेश राहुल हॉस्पिटलमध्ये अन् मैदानावरून बसला त्याला दुसरा धक्का
मयांक अग्रवालनं ( Mayank Agarwal) त्याच्यावर सोपवलेली कर्णधाराची जबाबदारी चोख पार पाडली. लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत पंजाब किंग्सनं ( Punjab Kings) मयांकच्या खांद्यावर जबाबदारी सोपवली. त्यानं प्रचंड दबावात संयमानं खेळ करताना अर्धशतक झळकावले, शिवाय संघालाही समाधानकारक पल्ला गाठून दिला. प्रभसिमरन सिंग व ख्रिस गेल यांना बाद करून कागिसो रबाडानं मोठा धक्का दिला. पदार्पण करणाऱ्या डेवीड मलाननं आज कर्णधार मयांकसह तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना पंजाबचा डाव सावरला. मयांक ५८ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांसह ९९ धावांवर नाबाद राहिला. पंजाबनं २० षटकांत ६ बाद १६६ धावा केल्या. PBKS vs DC, PBKS vs DC live score, IPL 2021, IPL 2021 latest news
प्रत्युत्तरात पृथ्वी शॉ व शिखर धवन या फॉर्मात असलेल्या जोडीची बॅट तळपली. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये ६३ धावा जोडल्या. पण, सातव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हरप्रीत ब्रारनं DCला पहिला धक्का दिला. पृथ्वी २२ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ३९ धावा केल्या. त्यानं पहिल्या विकेटसाठी ३८ चेंडूंत ६३ धावा जोडल्या. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ व शिखर यांनी संयमी खेळ करताना DCचा धावांचा वेग कायम राखला. या दोघांची ४८ ( ४१ चेंडू) धावांची भागीदारी १३व्या षटकात रिली मेरेडीथनं २५ धावा करणाऱ्या स्मिथला माघारी पाठवले. PBKS vs DC IPL Matches, PBKS vs DC IPL match 2021