ipl 2021 t20 PBKS vs DC live match score updates Ahmedabad : लोकेश राहुलच्या ( KL Rahul) अनुपस्थितीत पंजाब किंग्सला ( Punjab Kings) आज आयपीएल २०२१तदिल्ली कॅपिटल्सचा ( Delhi Capitals) सामना करावा लागणार आहे. लोकेशला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानं आजच्या सामन्यात मयांक अग्रवाल पंजाब किंग्सचे नेतृत्व सांभाळणार आहे. दिल्लीनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. IPL 2021 : PBKS vs DC T20 Live Score Update
रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला धक्का दिल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला पंजाब किंग्स संघ आता तुफान फॉर्ममध्ये असलेल्या दिल्ली कॅपिटल्सला धडक देण्यास सज्ज झाला आहे. दोन्ही संघांची फलंदाजी आणि गोलंदाजी मजबूत असल्याने चाहत्यांना तुल्यबळ लढतीचा आनंद मिळेल. मात्र, यंदाच्या सत्रातील दिल्लीचा सुरू असलेला धडाका पाहून पंजाबला विजयासाठी सर्वोत्तम खेळ करावा लागेल. पंजाबसाठी गेल्या सामन्यात हरप्रीत ब्रार विजयाचा शिल्पकार ठरला होता. त्याने कर्णधार विराट कोहलीसह ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डीव्हिलियर्स यांना बाद करून पंजाबचा विजय साकारला होता. IPL 2021, IPL 2021 latest news, PBKS vs DC IPL Matches
दिल्ली कॅपिटल्स - पृथ्वी शॉ, शिखर धवन, स्टीव्ह स्मिथ, रिषभ पंत, मार्कस स्टॉयनिस, शिमरोन हेटमायर, ललित यादव, अक्षर पटेल, कागिसो रबाडा, आवेश खान, इशांत शर्मा ( Delhi Capitals: 1 Prithvi Shaw, 2 Shikhar Dhawan, 3 Steven Smith, 4 Rishabh Pant (capt, wk), 5 Marcus Stoinis, 6 Shimron Hetmyer, 7 Lalit Yadav, 8 Axar Patel, 9 Kagiso Rabada, 10 Avesh Khan, 11 Ishant Sharma)
पंजाब किंग्स - मयांक अग्रवाल, प्रभसिमरन सिंग, ख्रिस गेल, डेव्हिड मलान, दीपक हुडा, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ख्रिस जॉर्डन, रिले मेरेडीथ, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी ( Punjab Kings: 1 Mayank Agarwal (capt.), 2 Prabhsimran Singh (wk), 3 Chris Gayle, 4 Dawid Malan, 5 Deepak Hooda, 6 Shahrukh Khan, 7 Harpreet Brar, 8 Chris Jordan, 9 Riley Meredith, 10 Ravi Bishnoi, 11 Mohammed Shami)
KL Rahulला करावं लागलं हॉस्पिटलमध्ये अॅडमिट, करावी लागणार शस्त्रक्रीया
पंजाब किंग्सचा कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) याला रविवारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. लोकेश यंदाच्या आयपीएलमध्ये ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. त्यान ७ सामन्यांत ३३१ धावा केल्या आहेत आणि त्यात चार अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद ९१ ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. लोकेशच्या अनुपस्थितीत आजच्या सामन्यात ख्रिस गेल संघाचे नेतृत्व सांभाळू शकतो.
''काल रात्री लोकेश राहुलच्या ओटीपोटात दुखू लागलं आणि प्राथमिक उपचारानंतरही त्याला बरं न वाटू लागल्यानं पुढील चाचणी साठी आप्तकालीन रुममध्ये नेण्यात आले. तेथे त्याला अपेंडिसिटिसचा त्रास असल्याचे समोर आले आहे. शस्त्रक्रीया करून तो बरा होऊ शकतो. त्याच्या सुरक्षिततेसाठी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत आहे,'' असे पंजाब किंग्सनं पोस्ट केलं आहे.
Web Title: IPL 2021 : PBKS vs DC T20 Live Score Update : Mayank Agarwal leading PBKS, Delhi Capitals chose to field
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.