मयांक अग्रवालचे अनफिट असणे हा सामन्याआधी पंजाब किंग्ससाठी मोठा धक्का होता. पण, लोकेश राहुल व ख्रिस गेल या अनुभवी फलंदाजांनी त्यांची जबाबदारी ओळखली. गेल व लोकेश यांच्या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी ४५ चेंडूंत ८० धावांची भागीदारी करून पंजाब किंग्सचा पाया मजबूत केला. कर्णधार लोकेश राहुलनं संयमी खेळ करताना एक बाजू लावून धरली अन् ५७ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांच्या मदतीनं नाबाद ९१ धावांची खेळी केली. त्याच्या साथीला हरप्रीत ब्रार सप्राईज पॅकेज ठरला. त्यानं १७ चेंडूंत २५ धावा करताना लोकेशसह ३२ चेंडूंत ६१ धावा जोडल्या. पंजाब किंग्सनं ५ बाद १७९ धावा केल्या. ७ चेंडू... विराट, मॅक्सवेल व एबीची विकेट...; २५ वर्षीय हरप्रीत ब्रार ठरला गेम चेंजर!
प्रत्युत्तरात, देवदत्त पडीक्कलनं खणखणीत षटकार मारून इरादे स्पष्ट केले, परंतु रिली मेरेडीथ यानं त्याचा त्रिफळा उडवला. कर्णधार विराट कोहली व रजत पाटीदार यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या हरप्रीत ब्रारनं कमाल केली. ब्रारनं ११व्या षटकात सलग दोन चेंडूंत विराट ( ३५) व ग्लेन मॅक्सवेल ( ०) यांना बाद केले. RCBसाठी हे धक्के कमी होते की काय, ब्रारनं पुढील षटकात एबी डिव्हिलियर्सचा ( ३) अडथळा सहज दूर केला. ब्रारनं ४ षटकांत १ निर्धाव षटक १९ धावा अन् ३ विकेट्स घेतल्या. या धक्क्यानंतर RCBला सावरणे अवघड झाले.RCBला ८ बाद १४५ धावांवर समाधान मानावे लागले. पंजाबनं हा सामना ३४ धावांनी जिंकला. '६ प्रौढ व ४ मुलांना झालाय कोरोना'; आर अश्विनच्या पत्नीनं कुटूंबाच्या कोरोनासोबतच्या संघर्षाचे दिले अपडेट्स
पाहा भन्नाट मीम्स