ipl 2021 t20 PBKS Vs RCB live match score updates Ahmedabad : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा ( Royal Challengers Banglore) संघ पुन्हा आपल्या मुळ स्वभावात आलेला पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या सहा सामन्यांत पाच विजय मिळवणाऱ्या RCBला दुसरा पराभवाचा धक्का बसला. पंजाब किंग्सचा ( Punjab Kings) हरप्रीत ब्रार ( Harpreet Brar ) हा गेम चेंजर ठरला. त्यानं दोन षटकांत विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल व एबी डिव्हिलियर्स या RCBच्या तीन प्रमुख फलंदाजांना माघारी पाठवले अन् सामना PBKSच्या पारड्यात पडला. हरप्रीतनं फलंदाजीतही कर्णधार लोकेश राहुलसोबत अर्धशतकी भागीदारी केली. IPL 2021 : PK Vs RCB T20 Live Score Update '६ प्रौढ व ४ मुलांना झालाय कोरोना'; आर अश्विनच्या पत्नीनं कुटूंबाच्या कोरोनासोबतच्या संघर्षाचे दिले अपडेट्स
आयपीएल २०२१मध्ये कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरलेल्या पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी ( Punjab Kings) आजही निराश केले. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या ( Royal Challengers Banglore) गोलंदाजांची लोकेश राहुल व ख्रिस गेल यांची पिसे उपटली, परंतु गेल बाद झाला अन् PBKSच्या फलंदाजांनी तंबूत परतण्याच्या रांगा लावल्या. कर्णधार राहुल एकाबाजून खिंड लढवत होता. पण, त्याला अन्य फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. हरप्रीत ब्रारनं अखेरच्या षटकांत थोडी फार फटकेबाजी करून पंजाब किंग्सला समाधानकारक पल्ला उभारून दिला. गेल २४ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ४६ धावांवर माघारी परतला. IPL 2021, IPL 2021 latest news, PBKS Vs RCB IPL Matches IPL 2021 : कृणाल पांड्या सहकाऱ्यांना देतो तुच्छ वागणूक; Video Viral होताच चाहते संतापले
लोकेशनं ३५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं, परंतु निकोलस पूरन ( ०) पुन्हा अपयशी ठरला. यंदाच्या आयपीएलमध्ये तो चौथ्यांदा शून्यावर बाद झाला आहे. लोकेश व हरप्रीत ब्रार यांनी सहाव्या विकेटसाठी विकेटसाठी ३२ चेंडूंत ६१ धावांची भागीदारी केली. लोकेश ५७ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह ९१ धावांवर नाबाद राहिला. पंजाब किंग्सनं ५ बाद १७९ धावा केल्या. ब्रार २५ धावांवर नाबाद राहिला. PBKS Vs RCB T20 Match,PBKS Vs RCB Live Score, PBKS Vs RCB Live Match
प्रत्युत्तरात, देवदत्त पडीक्कलनं खणखणीत षटकार मारून इरादे स्पष्ट केले, परंतु रिली मेरेडीथ यानं त्याचा त्रिफळा उडवला. कर्णधार विराट कोहली व रजत पाटीदार यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या हरप्रीत ब्रारनं कमाल केली. त्यानं ११व्या षटकात सलग दोन चेंडूंत विराट ( ३५) व ग्लेन मॅक्सवेल ( ०) यांना बाद केले. RCBसाठी हे धक्के कमी होते की काय, ब्रारनं पुढील षटकात एबी डिव्हिलियर्सचा ( ३) अडथळा सहज दूर केला. ब्रारनं ४ षटकांत १ निर्धाव षटक १९ धावा अन् ३ विकेट्स घेतल्या. ब्रारच्या गोलंदाजीवर पुढे येऊन मारण्याच्या प्रयत्नात विराट त्रिफळाचीत झाला. चेंडू खालीच राहिला होता. मॅक्सवेलला काही कळण्यापूर्वीच ब्रारनं टाकलेल्या चेंडूनं त्याच्या त्रिफळा उडवला होता. IPL 2021, IPL 2021 latest news, PBKS Vs RCB IPL Matches ४.८ कोटींचा पाऊस, २९८ धावांची वादळी खेळी; पंजाब किंग्सच्या प्रभसिमरन सिंगचा करिष्मा आज चाललाच नाही
या धक्क्यानंतर RCBला सावरणे अवघड झाले. शाहबाज अहमद व रजत पाटीदार हे फलंदाजही माघारी फिरले. पंजाबनं हा सामना ३४ धावांनी जिंकून प्ले ऑफच्या आशा अजूनही जिवंत ठेवल्या आहेत. RCBला ८ बाद १४५ धावांवर समाधान मानावे लागले. रवी बिश्नोईनंही ४ षटकांत १७ धावांत २ विकेट्स घेतल्या. हर्षल पटेल १३ धावांत ३१ ( ३ चौकार व २ षटकार) धावांवर बाद झाला. बिश्नोईनं त्याचा अफलातून झेल टिपला.