IPL 2021, PBKS vs SRH, Live: हैदराबादी गोलंदाजीचा झणझणीत तडका! पंजाब किंग्जला १२० धावांत रोखलं

 IPL 2021, PBKS vs SRH, Live: आयपीएलमध्ये पहिले तीन सामने गमावल्यानंतर अखेर आज सनरायझर्स हैदराबादच्या संघाला सुर गवसलेला दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 05:17 PM2021-04-21T17:17:27+5:302021-04-21T17:17:58+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 PBKS vs SRH Live Punjab Kings all out for 120 sunrisers hyderabad need 121 runs to win | IPL 2021, PBKS vs SRH, Live: हैदराबादी गोलंदाजीचा झणझणीत तडका! पंजाब किंग्जला १२० धावांत रोखलं

IPL 2021, PBKS vs SRH, Live: हैदराबादी गोलंदाजीचा झणझणीत तडका! पंजाब किंग्जला १२० धावांत रोखलं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 IPL 2021, PBKS vs SRH, Live: आयपीएलमध्ये पहिले तीन सामने गमावल्यानंतर अखेर आज सनरायझर्स हैदराबादच्या संघाला सुर गवसलेला दिसत आहे. सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी आज कमालीची कामगिरी करत पंजाब किंग्जचा डाव १२० धावांत रोखला आहे. हैदराबादसमोर विजयासाठी आता १२१ धावांचं आव्हान आहे. (IPL 2021 PBKS vs SRH Live Punjab Kings all out for 120 sunrisers hyderabad need 121 runs to win)

पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुल यानं सामन्याची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हैदराबादच्या गोलंदाजांनी पंजाबचा निर्णय सपेशल चुकीचा ठरवत फलंदाजांना मैदानात टिकूच दिलं नाही. सध्या तुफान फॉर्मात असलेल्या केल राहुल याला भुवनेश्वर कुमारनं अवघ्या ४ धावांवर बाद केलं. केदार जाधवनं राहुलचा झेल टिपला. त्यानंतर मयांक अग्रवाल (२२) खलील अहमदच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. सलामीवीर स्वस्तात बाद झाल्यानंतर ख्रिस गेलच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. पण फिरकीपटू राशिद खान यांनं गेलला फिरकी जाळ्यात ओढलं. गेल १५ धावांवर बाद झाला. तर निकोलस पुरन खातं देखील उघडू शकला नाही. डेव्हिड वॉर्नरनं त्याला धावचीत केलं. 

शाहरुख खान यानं संघाचा डाव रुळावर आणण्यासाठी प्रयत्न केला. त्यानं १७ चेंडूत २२ धावा केल्या. यात दोन षटकारांचा समावेश होता. अखेरच्या षटकांमध्ये मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. सामन्याच्या अखेरच्या षटकातील दोन चेंडू शिल्लक असताना पंजाबचा डाव ११९ धावांमध्ये संपुष्टात आला. 

सनरायझर्स हैदराबादकडून अखील अहमद यानं सर्वाधिक ३ बळी घेतले. तर अभिषेक शर्मानं दोघांना माघारी धाडलं. भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, राशिद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. 
 

Web Title: IPL 2021 PBKS vs SRH Live Punjab Kings all out for 120 sunrisers hyderabad need 121 runs to win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.