IPL 2021, PBKS vs SRH, Live: सनरायझर्स हैदराबाद संघाचे ( Sunrisers Hyderabad) खेळाडू आज फुल चार्ज होऊन मैदानावर उतरले. पंजाब किंग्सचे ( Punjab Kings) शेर आज ढेर झाले. हैदराबादच्या गोलंदाजांनी त्यांना आज कागदावरचे वाघ, बनवून ठेवले. गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीनंतर SRHचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर व जॉनी बेअरस्टो यांनी दमदार सलामी देताना विजयाचा पाया रचला. केन विलियम्सनला खेळवल्यानं SRHच्या मधल्या फळीला बळकटी मिळाली आणि त्याचा फायदा त्यांना झाला. SRH आयपीएल २०२१मधील पहिल्या विजयाची चव चाखली अन् संघाची CEO काव्या मारन हिच्या चेहऱ्यावरील कळी फुलली..SRH vs PBKS IPL Matches, SRH vs PBKS IPL match 2021
PBKS नं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबचे ४ फलंदाज अवघ्य ४७ धावांवर माघारी पाठवून SRHनं सामन्यावर पकड बनवली आहे.प्रथम फलंदाजीला मैदानावर उतरलेल्या लोकेश राहुलला चौथ्याच षटकात ४ धावांवर भुवनेश्वर कुमारनं चालतं केलं. मयांक अग्रवाल ( २२), शाहरुख खान ( २२) ही दोघं वगळता पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी आज निराश केले. खलील अहमदनं २१ धावांत ३ विकेट्स घेतल्या. राशिद खाननं ४ षटकांत १७ धावांत १ विकेट घेतली. अभिषेक शर्मा ( २/२४), भुवनेश्वर कुमार ( १/७) व सिद्धार्थ कौल ( १/२७) यांची दमदार कामगिरी केली. SRH vs PBKS, SRH vs PBKS live score,
प्रत्युत्तरात, जॉनी बेअरस्टो व डेव्हीड वॉर्नर यांनी SRHला दमदार सुरूवात करून दिली. या दोघांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये ५० धावा जोडल्या. या दोघांनी हैदराबादच्या विजयाचा पाया रचला होता. ११व्या षटकात फॅबियन अॅलननं ही जोडी तोडली. वॉर्नर ३७ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ३७ धावांवर माघारी परतला. मधल्या फळीतील अपयशामुळे SRHला मागील सामना हातचा गमवावा लागला होता. त्यातून धडा घेत आज त्यांनी अनुभवी केन विलियम्सनला खेळवले. त्यानं जॉनी बेअरस्टोला साजेशी साथ देताना सावध खेळ केला. पण, त्यांचा हा सावधपणा SRHच्या ताफ्यात धाकधुक निर्माण करणारा ठरत होता.SRH vs PBKS T20 Match, SRH vs PBKS Live Score