Join us  

IPL 2021 Phase 2 Dates & Schedule: आयपीएल २०२१ची नवीन तारीख आली समोर, शनिवार-रविवारी नाही तर या दिवशी सुरू होणार दुसरा टप्पा! 

IPL 2021 Phase 2 Dates & Schedule: इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाचे उर्वरित ३१ सामने संयुक्त अरब अमिराती ( UAE) येथे होतील, याची घोषणा बीसीसीआनं नुकतीच केली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2021 10:53 AM

Open in App

IPL 2021 Phase 2 Dates & Schedule: इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाचे उर्वरित ३१ सामने संयुक्त अरब अमिराती ( UAE) येथे होतील, याची घोषणा बीसीसीआनं नुकतीच केली. बीसीसीआयनं २९ मे रोजी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आता ही स्पर्धा कधी सुरू होईल याची सर्वांना उत्सुकता आहे. ९ एप्रिलला सुरू झालेले आयपीएलचे १४वे पर्व २९ सामन्यानंतर स्थगित करावे लागले होते. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं आयपीएलसाठी तयार केलेला बायो बबल भेदला अन् अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर २९ मे ला बीसीसीआयनं उर्वरित सामने होणार असल्याची घोषणा केली. अनुष्का शर्माही लंडन दौऱ्यावर जाऊ शकणार; भारतीय खेळाडूंच्या कुटुंबीयांना मिळाली सरकारची परवानगी!

आयपीएलच्या उर्वरित सामन्यांची तारीख जाहीर झाली असली तरी अनेक अडचणी अजूनही बीसीसीआयसमोर जशाच्या तशा आहेत. आयपीएल २०२१ दरम्यान इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्या आंतरराष्ट्रीय मालिका आहेत. त्यामुळे या देशातील खेळाडू आयपीएलला मुकण्याची शक्यता आहेत. भुवनेश्वर कुमार व त्याच्या पत्नीत दिसले कोरोनाची लक्षणं, आईला करावं लागलं हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट 

आंतरराष्ट्रीय मालिका. 

  • इंग्लंड - बांगलादेश दौरा ( ३ वन डे व ३ ट्वेंटी-२०), पाकिस्तानविरुद्धची दोन सामन्याची मालिका 
  • न्यूझीलंड - न्यूझीलंड यूएईत पाकिस्तानविरुद्ध ३ वन डे व ३ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार 
  • ऑस्ट्रेलिया - श्रीलंकेविरुद्ध ३ वन डे व ३ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेचे आयोजन
  • दक्षिण आफ्रिका - नेदरलँड्स यांच्याविरुद्धची मालिका, त्यानंतर काही खेळाडू CPL 2021त खेळणार  

 

आयपीएल २०२१च्या उर्वरित सामन्यांची नवी तारीख

आयपीएलचे उर्वरित सामने १८ किंवा १९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत खेळवण्यात येतील असा अंदाज होता. पण, आता नव्या तारखेनुसार ही स्पर्धा १७  सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका १४ सप्टेंबरला संपत आहे आणि त्यानंतर भारतीय खेळाडू लगेच दुबईत दाखल होतील. या स्पर्धेच्या आयोजनाची चर्चा करण्यासाठी बीसीसीआयचे सचिव जय शाह, खजिनदार अरुण सिंग धुमल व उपाध्यक्ष राजीव शुक्ला दुबईत आहेत.   

यूएईत होणाऱ्या आयपीएलच्या ३१ सामन्यात प्रेक्षकांना प्रवेश मिळू शकतो. अमिरात क्रिकेट बोर्ड किमान ५० टक्के प्रेक्षकांना मैदानात प्रवेश देण्याची शक्यता आहे. त्यासाठी लस घेण्याची अट अनिवार्य करण्यात आली आहे.

टॅग्स :आयपीएल २०२१संयुक्त अरब अमिरातीबीसीसीआय