Join us  

Play & Win: 'लोकमत डॉट कॉम'वर T20 क्विझ खेळा अन् रोज जिंका बक्षिसं; 'बंपर प्राईज' जिंकण्याचीही सुवर्णसंधी 

IPL 2021 Play and Win Quiz: आयपीएल स्पर्धा संपेपर्यंत रोज होणाऱ्या या क्विझमध्ये जास्तीत जास्त अचूक उत्तरं देणारे तीन विजेते निवडण्यात येणार आहेत आणि त्यांना मिळणार आहे 'बंपर प्राईज'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 2:35 PM

Open in App

केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये आयपीएलची क्रेझ किती आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. कोरोनाच्या लाटेमुळे पसरलेली नकारात्मकता, निराशा काही काळासाठी विसरायला लावण्याची किमया गेल्या वर्षीच्या आयपीएल स्पर्धेनं केली होती. त्यानंतर, आयपीएल-14 चा 'रन'संग्राम नुकताच सुरू झालाय आणि रंगूही लागलाय. या स्पर्धेची 'रणांगणा'वरची आणि मैदानाबाहेरची प्रत्येक बातमी 'लोकमत डॉट कॉम' तुमच्यापर्यंत पोहोचवतंय. 

https://www.lokmat.com/ipl-2021/ या खास मायक्रो साईटवर आयपीएलची संपूर्ण खबरबात तुम्हाला मिळू शकेल. अगदी यंदाच्या वेळापत्रकापासून ते आयपीएलमधील रेकॉर्ड्सपर्यंत, लाईव्ह स्कोअरपासून पॉइंट्स टेबलपर्यंत आणि प्लेअर प्रोफाईलपासून ऑरेंज-पर्पल कॅपच्या मानकऱ्यांपर्यंत सगळं काही तुम्हाला या आयपीएल पेजवर पाहता येईल. 

रोजच्या रोज व्हाऊचर्स आणि शेवटी 'स्मार्ट' बक्षिसं

'लोकमत डॉट कॉम'च्या क्रिकेटवेड्या वाचकांसाठी आम्ही घेऊन आलोय बक्षिसं जिंकण्याची सुवर्णसंधी.

https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/ या लिंकवर आयपीएल स्पर्धेबाबत विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरं देऊन तुम्ही रोज १५०० रुपयांची व्हाऊचर्स जिंकू शकता आणि Shop.Fancode.com या वेबसाईटवरून टी-शर्ट, कॅप किंवा अन्य ऑफिस मर्चेंडाईस खरेदी करू शकता. 

इतकंच नव्हे तर, स्पर्धा संपेपर्यंत रोज होणाऱ्या या क्विझमध्ये जास्तीत जास्त अचूक उत्तरं देणारे तीन विजेते निवडण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला 'बंपर प्राईज' म्हणून५५ इंची स्मार्ट टीव्ही, दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला ४३ इंची स्मार्ट टीव्ही, तर तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला ३२ इंची स्मार्ट टीव्ही दिला जाणार आहे. 

तुम्ही तुमच्या गुगल किंवा फेसबुक अकाउंटद्वारे या क्विझमध्ये सहभागी होऊ शकता. रोज तुम्हाला दहा प्रश्न विचारले जातील आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी २५ सेकंदांचा वेळ असेल. अर्थातच, जास्तीत जास्त प्रश्नांची बरोब्बर उत्तरं देणारे स्पर्धक विजेते ठरतील.

तर मग, वाट कसली बघताय. 'आपका टाईम शुरू होता है...' घरबसल्या खेळा आणि जिंका!

टॅग्स :आयपीएल २०२१मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर