IPL 2021 Playoffs: विराट कोहलीच्या संघाला मोठा धक्का; वर्ल्ड कपसाठी दोन खेळाडू परतले माघारी

बंगलोरनं १४ सामन्यांत १८ गुणांसह तिसरे, तर कोलकातानं १४ गुणांसह चौथे स्थान पटकावून प्ले ऑफमधील स्थान पक्के केले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 06:04 PM2021-10-10T18:04:31+5:302021-10-10T18:07:54+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 Playoffs: Big blow for KKR & RCB, Shakib Al Hasan and Sri Lankan duo asked to join national teams for WC camp | IPL 2021 Playoffs: विराट कोहलीच्या संघाला मोठा धक्का; वर्ल्ड कपसाठी दोन खेळाडू परतले माघारी

IPL 2021 Playoffs: विराट कोहलीच्या संघाला मोठा धक्का; वर्ल्ड कपसाठी दोन खेळाडू परतले माघारी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021 Playoffs: कोलकाता नाइट रायडर्स  ( KKR) व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) यांना प्ले ऑफ लढतीपूर्वी मोठा धक्का बसला आहे. दोन्ही संघातील बांगलादेश व श्रीलंकेचे खेळाडू राष्ट्रीय कर्तव्यासाठी परतणार आहेत आणि ते एलिमिनेटर सामन्यात खेळू शकणार नाहीत. शाकिब अल हसन ( KKR) हा आज बागलादेशच्या ताफ्यात दाखल झाला आणि वनिंदू हसरंगा व दुष्मंथा चमिरा ( RCB) यांनीही फ्रँचायझीकडे रिलीज करण्याची विनंती केली आहे. याचा अर्थ हे तिघंही एलिमिनेटर सामन्यासाठी उपलब्ध नसणार आहेत.  
बांगलादेशच्या संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी दुबईत कॅम्प लावाल आहे आणि शाकिब अल हसन या कॅम्पमध्ये दाखल झाला आहे. राजस्थान रॉयल्स संघातील मुस्ताफिजूर रहमान हाही बांगलादेशच्या कॅम्पमध्ये दाखल झाला आहे. ''मुस्ताफिजूर  व शाकिब हे यूएईत बांगलादेशच्या ताफ्यात दाखल झाले आणि तेथून अबु धाबी येथे सर्व खेळाडू सराव सामन्यासाठी गेले,''अशी माहिती बांगलादेश क्रिकेट क्लबनं दिली. बांगलादेशचा संघ दोन सराव सामने खेळणार आहे, १२ ऑक्टोबरला त्यांच्यासमोर श्रीलंका आणि १४ ऑक्टोबरला आयर्लंडचे आव्हान आहे. त्यानंतर ते ओमान येथे दाखल होतील. 

RCBचे विनंदू हसरंगा व दुष्मथा चमिरा हेही आयपीएल बायो बबल सोडून राष्ट्रीय संघात दाखल होतील. त्यांचा पहिला सराव सामना बांगलादेशविरुद्ध आहे, तर १४ ऑक्टोबरला ते पपुआ न्यू गिनीविरुद्ध खेळतील. बंगलोरनं १४ सामन्यांत १८ गुणांसह तिसरे, तर कोलकातानं १४ गुणांसह चौथे स्थान पटकावून प्ले ऑफमधील स्थान पक्के केले. 

Web Title: IPL 2021 Playoffs: Big blow for KKR & RCB, Shakib Al Hasan and Sri Lankan duo asked to join national teams for WC camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.