IPL 2021 News : उर्वरित स्पर्धा मुंबईत की थेट ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर?; फ्रँचायझीमध्ये पडले दोन गट!

IPL 2021 :there is a possibility that remaining IPL matches could be played after the T-20 World Cup इंडियन प्रीमिअर लीगचे १४वे पर्व ( IPL 2021) स्थगित करण्याचा निर्णय अखेर BCCIनं घेतला. आयपीएलसाठी तयार केलेला बायो बबल मध्यांतरानंतर अखेर कोरोना व्हायरसनं भेदला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 01:44 PM2021-05-04T13:44:58+5:302021-05-04T13:46:48+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 : possibility that remaining IPL matches could be played after the T-20 World Cup | IPL 2021 News : उर्वरित स्पर्धा मुंबईत की थेट ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर?; फ्रँचायझीमध्ये पडले दोन गट!

IPL 2021 News : उर्वरित स्पर्धा मुंबईत की थेट ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर?; फ्रँचायझीमध्ये पडले दोन गट!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगचे १४वे पर्व ( IPL 2021) स्थगित करण्याचा निर्णय अखेर BCCIनं घेतला. आयपीएलसाठी तयार केलेला बायो बबल मध्यांतरानंतर अखेर कोरोना व्हायरसनं भेदला. एकामागून एक कोरोना पॉझिटिव्ह खेळाडू वाढत असताना हा असा निर्णय घेणं योग्यच म्हणावं लागेल. स्पर्धेची ३० सामने खेळवण्यात आली असून उर्वरित सामने केव्हा व कधी होतील याची चर्चा सुरू झाली आहे. देशातील सध्याची कोरोना परिस्थिती पाहता, उर्वरित स्पर्धा लवकर सुरू होण्याची शक्यता फार कमी आहे. पण, काही फ्रँचायझींमध्ये त्यावरून दोन गट पडल्याचे चित्र समोर येत आहे. IPL 2021 :there is a possibility that remaining IPL matches could be played after the T-20 World Cup

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुल्का यांनी आयपीएल स्पर्धा रद्द करत असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघातही कोरोना धडकला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा फिरकीपटू अमित मिश्रा आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचा यष्टीरक्षक वृद्धीमान सहा यांना कोरोनाची लागण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयनं सुरक्षेच्या कारणास्तव स्पर्धा रद्द करत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे

ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर दुसरा टप्पा?
आता स्पर्धेचे उर्वरित ३० सामने ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतरच होतील अशी चर्चा सुरू आहे. भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे, परंतु त्यावरही कोरोनाचं सावट आहे. ही स्पर्धा यूएईत खेळवण्याचा विचार आयसीसी करत आहे. तसे झाल्यास आयपीएल २०२१चा दुसरा टप्पाही यूएईत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  


मुंबईत होणार सर्व सामने?
बीसीसीआयनं आयपीएलचा बायो बबल पूर्वरत करून ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेत उर्वरित सर्व सामने मुंबईत खेळवण्याच्या हालचाली सुरू केल्याचीही चर्चा आहे. त्यासाठीच किमान आठवडाभर ही स्पर्धा स्थगित केली आहे. याकालावधीत सर्व संघांना मुंबईत हलवण्यात येणार आहे. पण, काही फ्रँचायझी सद्य परिस्थितित आता सामने खेळण्याच्या तयारीत नाहीत, तर काहींना ही स्पर्धा सुरू ठेवायची आहे.   

Web Title: IPL 2021 : possibility that remaining IPL matches could be played after the T-20 World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.