आयपीएलच्या सलग तीन पर्वात सुपर ओव्हरमध्ये सलग विजय मिळणारा DC हा पहिलाच संघ ठरला, तर पराभूत होणारा SRH हाही पहिला संघ ठरला. या सामन्यात दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) जबरदस्त फॉर्मात दिसत होता. या सामन्यात पृथ्वीनं ३९ चेंडूंत ७ चौकार व १ षटकार खेचून ५३ धावा चोपल्या आणि तो मोठी खेळी करेल असेच वाटत होते. पण, रिषभ पंतनं ( Rishabh Pant) चूकाची कॉल दिला अन् पृथ्वीला धावबाद होऊन माघारी जावं लागलं. त्यानंतर पृथ्वी प्रचंड रागात दिसला आणि त्यानं डगआऊटमध्ये जाताच राग व्यक्त करताना हेल्मेट फेकले.
पाहा व्हिडीओ...
दिल्लीनं ४ बाद १५९ धावा केल्या होत्या आणि प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादला ७ बाद १५९ धावा करता आल्या.
सुपर ओव्हरचा थरार
- केन विलियम्सन व डेव्हिड वॉर्नर हैदराबादकडून मैदानावर उतरले. अक्षर पटेलनं दिल्लीसाठी ते षटक फेकले. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव आली अन् केननं दुसरा चेंडू चौकार खेचला. हैदराबादला त्या षटकात ८ धावा करता आल्या. पण, वॉर्नरनं एक धाव शॉर्ट धावल्यानं SRHला ७ धावांवर समाधान मानावे लागले.
- राशिद खानला गोलंदाजीला आणल्याचं पाहताच दिल्लीनं रिषभ पंत व शिखर धवन ही डावखुरी जोडी मैदानावर उतरवली. रिषभ पंतनं पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली. दुसऱ्या चेंडूवर एक धाव आल्यानंतर रिषभनं तिसऱ्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारून चौकार खेचला. राशिदनं पुढील दोन चेंडू निर्धाव फेकली अन् पाचव्या चेंडूवर रिषभसाठी LBWची अपील झाली. पण, SRHचा DRS वाया गेला. अखेरच्या चेंडूवर एक धाव घेत दिल्लीनं विजय पक्का केला.