Join us  

IPL 2021 : मुंबईत रोज ७ -८ हजार कोरोना रुग्ण सापडतात, तरीही तिथे सामने खेळवणार; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची टीका! 

IPL 2021: BCCI नं रविवारी इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाचं वेळापत्रक जाहीर केलं. ( IPL 2021 Schedule)  अहमदाबाद, मुंबई, चेन्नई, दिल्ली, बंगळुरू आणि कोलकाता या सहा शहरांमध्ये आयपीएलचे सामने खेळवण्यात येणार आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 10:32 AM

Open in App

BCCI नं रविवारी इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाचं वेळापत्रक जाहीर केलं. ( IPL 2021 Schedule)  अहमदाबाद, मुंबई, चेन्नई, दिल्ली, बंगळुरू आणि कोलकाता या सहा शहरांमध्ये आयपीएलचे सामने खेळवण्यात येणार आहेत. पण, त्यामुळे काही फ्रँचायझी नाराज झाल्या आहेत. राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals), सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) आणि पंजाब किंग्स ( Punjab Kings) यांच्या होम ग्राऊंडमध्ये एकही सामना होणार नाही. त्यात पंजाब किंग्सचे CEO नेस वाडिया यांनी टीका केली होती. त्यात आता पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही बीसीसीआयला पत्र लिहिले आहे. ( Punjab CM Amarinder Singh written a mail to the BCCI ) आशिया चषक स्पर्धेत लोकेश राहुलकडे टीम इंडियाचं नेतृत्व; BCCI टीम B मैदानावर उतरवणार, जाणून घ्या Playing XI

मोहालीचा आयपीएल सामन्यांसाठी विचार केला जावा, अशी विनंती करणारे पत्र मेलद्वारे अमरिंदर सिंग यांनी BCCIला पाठवले आहे. तसेच त्यांनी मुंबईला यजमानपद दिल्यावरून टीका केली आहे. मुंबईत जवळपास ९००० कोरोना रुग्ण सापडत असतानाही बीसीसीआयनं त्यांना यजमानपद का दिलं, यावरूनही अमरिंदर सिंग यांनी टीका केली. ''मुंबईत दिवसाला ९००० कोरोना रुग्ण सापडत आहेत आणि अशा परिस्थितही तिथे आयपीएल सामने होऊ शकतात, मग मोहालीत का नाही?. आम्ही सर्व काळजी घेऊ,''असे अमरिंदर सिंग यांनी पत्रात लिहिले आहे.Jasprit Bumrah Wedding : झाला खुलासा!, जसप्रित बुमराह कधी व कुणासोबत करणार लग्न? 

शेतकरी आंदोलनामुळे मोहालीत आयपीएल सामन्यांचे आयोजन होऊ शकत नाही, हे बीसीसीआयनं आधीच स्पष्ट केले होते. शेतकरी आंदोलनामुळे आयपीएल सामन्यांत कोणताही व्यत्यय येऊ नये, असे बीसीसीआयला वाटते. ''मोहालीत आयपीएलचे सामने होत असताना स्टेडियमबाहेर शेतकऱ्यांचं आंदोलन व्हाव, अशी परिस्थिती उद्भवू नये असे आम्हाला वाटते. त्यामुळे जगभरातील प्रसिद्धी माध्यमांचं लक्ष केंद्रीत होईल. मोहालीतील अशी परिस्थिती असल्यामुळे आयपीएल सामन्यांसाठी या शहराचा विचार केला गेला नाही,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितले. IPL 2021 Venue : आयपीएलचे सामने मुंबईत होणार; IPL चेअरमन अन् BCCI सदस्यांनी घेतली शरद पवारांची भेट अन्... 

पंजाब किंग्सचे सामने कधी व कुठे?

 

टॅग्स :आयपीएलमुंबईपंजाबशेतकरी आंदोलन