Join us  

IPL 2021 : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूची भीती खरी होणार, पदार्पणाचा सामना शेवटचा ठरणार?; झहीर खानची मोठी घोषणा

Indian Premier Leage 2021 : गतविजेत्या मुंबई इंडियन्सची ( Mumbai Indians)  आयपीएलमधील पहिल्या सामन्यातील पराभवाची मालिका यंदाच्या पर्वातही कायम राहिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 3:37 PM

Open in App

Indian Premier Leage 2021 : गतविजेत्या मुंबई इंडियन्सची ( Mumbai Indians)  आयपीएलमधील पहिल्या सामन्यातील पराभवाची मालिका यंदाच्या पर्वातही कायम राहिली. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) नं आयपीएल २०२१च्या पहिल्याच सामन्यात MI ला पराभूत केलं. या सामन्यात ख्रिस लीननं ( Chris Lynn) पदार्पणातच ४९ धावांची खेळी केली होती. पण, त्याच्यामुळे कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) धावबाद झाला होता. त्यामुळेच सामन्यानंतर लीननं हा कदाचित माझा पहिला व अखेरचा सामना ठरेल, अशी भीती व्यक्त केली होती. हसत हसत केलेलं विधान आता खरं ठरणार आहे. मुंबई इंडियन्सचा दुसरा सामना बुधवारी कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) विरुद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वी MIचा सल्लागार समितीचा सदस्य झहीर खान ( Zaheer Khan) यानं मोठी घोषणा केली.  नितीश राणानं अर्धशतकाचं सेलिब्रेशन केलं खास स्टाईलमध्ये, त्यामागे आहे विशेष कारण!

सलामीच्या सामन्यात नेमकं काय झालं?मुंबईनं ( MI) विजयासाठी ठेवलेल्या १६० धावांचा पाठलाग करताना RCBचाही घाम निघाला, परंतु एबी डिव्हिलियर्सनं ( AB de Villiers) मॅच विनिंग खेळी केली. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या रोमहर्षक सामन्यात पाच विकेट्स घेणाऱ्या हर्षल पटेलनं ( Harshal Patel) RCBची विजयी धाव घेतली. विराट कोहलीच्या संघानं ( Virat Kohli) हा सामना २ विकेट्सनं जिंकला.  चौथ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर लीननं फटका मारला आणि रोहितनं धाव घेण्यासाठी मैदान सोडलं. विराट कोहली चेंडूजवळ पोहोचतोय असे दिसताच लीननं रोहितला माघारी जाण्यास सांगितले आणि तोपर्यंत विराटनं चेंडू यष्टींजवळ उभ्या असलेल्या चहलकडे सोपवला. रोहितला धावबाद होऊन माघारी परतावे लागले.  अम्पायरनं बाद देऊ नये म्हणून Nitish Rana नं दाखवली बॅट, जाणून घ्या नेमकं काय झालं

ख्रिस लीन काय म्हणाला होता...  रोहितला धावबाद केल्यानंतर ख्रिसलीननं दमदार खेळ करताना ३५ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४९ धावांची खेळी केली. पण, सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत हा कदाचित माझा अखेरचा सामना ठरेल, असे तो म्हणाला होता. रोहितला धावबाद केल्यानंतर असंच काहीसं होईल, ही भीती त्यानं व्यक्त केली होती. 

झहीर खाननं काय मोठी घोषणा केलीदक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक (Zaheer Khan confirms Quinton De Kock will be available for tomorrow's game against KKR) हा कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात खेळणार असल्याची माहिती जहीर खाननं दिली. क्विंटन हा MIचा महत्त्वाचा खेळाडू आहे. रोहित शर्मा आणि क्विंटन ही सलामीची जोडी प्रतिस्पर्धी संघांना हतबल करते. पहिल्या सामन्या दरम्यान क्विंटन क्वारंटाईन होता आणि आता त्यानं ७ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला आहे. त्यामुळे त्याच्या येण्यानं ख्रिस लीगचा पत्ता कट होईल, हीच दाट शक्यता आहे.  IPL 2021 : रोहित शर्मानं सामना गमावला पण मन जिंकलं; त्याच्या सामाजिक जाणीवेचे इंग्लंडच्या दिग्गजानं कौतुक केलं!

क्विंटननं मागील पर्वात १६ सामन्यांत ३५.९२च्या सरासरीनं चार अर्धशतकांसह ५०३ धावा चोपल्या होत्या. आयपीएलमध्ये त्यानं एकूण ६६ सामन्यांत १ शतक व १४ अर्धशतकांसह १९५९ धावा केल्या आहेत.

मुंबई इंडियन्सचा पुढील सामना १३ एप्रिल, ७.३० वा.पासून - कोलकाता नाईट रायडर्स वि. मुंबई इंडियन्स, चेन्नई

मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जयंत यादव, कीरोन पोलार्ड, क्रु णाल पंड्या, अनुकूल रॉय, इशान किशन, क्विंटन डी कॉक आदित्य तारे, धवल कुलकर्णी, जयंत यादव, क्रि स लिन, मोहसिन खान आणि अनमोलप्रीत सिंग, नॅथन कोल्टर नायर, अॅडम मिल्ने, पीयूष चावला, जेम्स निशम, युधवीर चरक, मार्को जॅन्सेन, अर्जुन तेंडुलकर  

टॅग्स :आयपीएल २०२१मुंबई इंडियन्सक्विन्टन डि कॉकझहीर खानकोलकाता नाईट रायडर्स