IPL 2021, Chennai Super Kings in Final : आयपीएलच्या मागील पर्वात साखळी सामन्यातील अखेरच्या तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी करून Spark दाखवणाऱ्या ऋतुराज गायकवाडनं ( Ruturaj Gaikwad) यंदाचं पर्व गाजवलं. IPL 2021त त्यानं आतापर्यंत १५ सामन्यांत एक शतक व ४ अर्धशतकांसह ६०३ धावा केल्या आहेत आणि आयपीएल २०२१त ६००+ धावा करणारा तो दुसरा फलंदाज आहे. ऋतुराजनं रविवारी दिल्ली कॅपिटल्स ( DC) विरुद्धच्या सामन्यात ७० धावांची उपयुक्त खेळी खेळली. शांत दिसणाऱ्या या ऋतुराजनं दिल्लीचा फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin) याला जशासतसे उत्तर दिले आणि ऋतुराजचा हा खोडकरपणा पाहून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले.
दिल्ली कॅपिटल्सनं पृथ्वी शॉ ( ३४ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ६० धावा), शिमरोन हेटमायर (३७ धावा) आणि रिषभ पंत ( ३५ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह नाबाद ५१ धावा) यांच्या खेळीच्या जोरावर ५ बाद १७२ धावा केल्या. प्रत्युत्तरात रॉबीन उथप्पा ( ६३) व ऋतुराज गायकवाड ( ७०) यांच्या ११० धावांच्या भागीदारी नंतर महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) ६ चेंडूंत ३ चौकार व १ षटकार खेचून नाबाद १८ धावा करताना चेन्नईला फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला. चेन्नईला अखेरच्या षटकात १३ धावा हव्या होत्या. टॉम कुरनच्या षटकात धोनीनं तीन खणखणीत चौकार खेचले. चेन्नईनं ४ विकेट्स राखून हा सामना जिंकला.
चेन्नईच्या डावातील ९व्या षटकात आर अश्विन व ऋतुराज यांच्यात मजेशीर किस्सा घडला. अश्विन गोलंदाजी करत होता आणि ऋतुराज स्ट्राईकवर होता. ऋतुराज फलंदाजीसाठी तयार असताना अश्विननं गोलंदाजीसाठी रनअप घेतलं आणि नॉन स्ट्रायकर एंडला येऊन थांबला. मग पुढे ऋतुराजनं त्याची फिरकी घेतली.
पाहा व्हिडीओ..
Web Title: IPL 2021 : R Ashwin Tries To Be Cheeky With Ruturaj Gaikwad; Batter Retorts With Similar Gesture, Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.