मुंबई इंडियन्स (MI) आणि कोलकाता नाईट रायडर्सदरम्यानचा (KKR) मंगळवारचा सामना खरंतर गोलंदाजांनी गाजवला. यात केकेआरच्या आंद्रे रसेलने (Andre Russell) 12 चेंडूत 15 धावा देऊन 5 बळी मिळवले तर मुंबई इंडियन्सच्या राहुल चाहरने (Rahul Chahar) 27 धावा देत चार बळी घेतले आणि मुंबई इंडियन्स जिंकल्याने राहुलचे चार बळी रसेलच्या पाच बळींना भारी पडले.
शाहरुखनं व्यक्त केलेल्या संतापावर आंद्रे रसेलनंही दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
टी-20 सामन्यात सहसा पाच बळी मिळविणाऱ्या गोलंदाजांचा संघ सामना हरण्याचे प्रमाण कमीच असते. त्यात रसेलने तर फक्त 12 चेंडूतच हे पाच बळी मिळवून मुंबईचा डाव 152 धावात गुंडाळला होता. सहाव्या क्रमांकापासून 10 व्या क्रमांकापर्यंतच्या ओळीने पाच फलंदाजांना बाद करुन मुंबईचा डाव संपुष्टात आणला होता. त्यानंतर राहुल चाहरने 27 धावांत 4 बळी मिळवून ट्रेंट बोल्ट व कृणाल पांड्याच्या मदतीने मुंबईला 10 धावांनी विजय मिळवून दिला.
'कोहली ब्रिगेड'ला 'देव' पावला; कोरोनावर मात करून धडाकेबाज सलामीवीर संघात परतला!
यात राहुल चाहरचा सामन्याच्या निकालावर सर्वाधिक प्रभाव पडला. तो यामुळे की तो नवव्या षटकात गोलंदाजीला आला त्यावेळी नाईट रायडर्सची विजयाकडे वाटचाल सुरू होती. त्यानंतर आपल्या पुढच्या प्रत्येक षटकात राहुलने विकेट काढली. नवव्या षटकात शुभमन गिल, 11 व्या षटकात राहुल त्रिपाठी, 13 व्या षटकात इऑन मॉर्गन आणि 15 व्या षटकात नितीश राणा यांच्या विकेट त्याने काढल्या. हे चारही केकेआरचे मुख्य फलंदाज होते आणि त्यात तुफान फॉर्मात असलेल्या नितीश राणाचीही विकेट होती. नितीश राणाने बाद होण्याआधी 47 चेंडूत 57 धावा केल्या आणि शुभमन गिल याने 24 चेंडूत 33 धावा केल्या. या दोघांनी 9 षटकांत 72 धावांची सलामी दिलेली होती पण ही स्थिरावलेली जोडी चाहरने तर फोडलीच शिवाय त्रिपाठी व मॉर्गन यांना स्थिरावू दिले नाही. त्यामुळेच केकेआरचा संघ 8.4 षटकात बिनबाद 72 वरुन 15 व्या षटकाअखेर 4 बाद 122 असा दबावात आला.
'ऑरेंज कॅप'च्या शर्यतीत 'इंडियन' तडका!, परदेशी खेळाडूंचा मागमूसच नाही!
दुसरीकडे रसेलने मिळवलेल्या पाच बळींपैकी चार गडी हे तळाकडचे होते. किरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या, मार्को जान्सेन, राहुल चाहर आणि जसप्रीत बुमराह यापैकी शेवटचे तिघे तर फलंदाजीत नगण्यच आहेत. शिवाय रसेलने पाच पैकी तीन गडी डावाच्या शेवटच्या षटकात बाद केले. त्यावेळी असाही मुंबईच्या तळाच्या फलंदाजांकडून मोठ्या संख्येने धावा करायचा धोका कमीच होता. यापैकी पोलार्ड हीच एक महत्त्वाची विकेट होती. डावात 17 चेंडू शिल्लक असताना त्याने पोलार्डला बाद केले पण नंतर तळाकडचे फलंदाज होते. हा फरक पाहाता राहुल चहरच्या चार विकेट रसेलच्या पाच विकेटला कधीही भारीच आहेत.