Indian Premier League 2021 : आयपीएलच्या १४व्या पर्वाला सुरूवात होण्यापूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ( Royal Challengers Bangalore) सलामीवीर देवदत्त पडिक्कल ( Devdutt Padikkal) कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याचा दुसरा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या ( Mumbai Indians) पहिल्या सामन्यात तो खेळू शकणार नाही. अशात RCBच्या दुसऱ्या सराव सामन्यात २७ वर्षीय फलंदाजाची तुफान फटकेबाजी पाहून कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) प्रभावित झाला आहे. आयपीएल २०२१साठी झालेल्या ऑक्शनमध्ये RCBनं २० लाखांच्या मुळ किंमतीत घेतलेला हा खेळाडू संघाची मधली फळी मजबूत करण्यासाठी फायद्याचा ठरणार आहे. त्याची फटकेबाजी पाहून विराटही भलताच खुश झाला आहे.
मध्यप्रदेशचा २७ वर्षीय फलंदाज रजत पाटिदारनं दुसऱ्या सराव सामन्यात गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. त्यानं ४९ चेंडूंत १०४ धावा कुटल्या. त्याच्या या फटकेबाजीच्या जोरावर त्याच्या संघानं १९.२ षटकांत २२५ धावांचं लक्ष्य पार केलं. पहिल्या सराव सामन्यातही रजतनं ३५ चेंडूंत ५४ धावांची खेळी केली होती. रजतची ही पहिलीच आयपीएल स्पर्धा आहे. विजय हजारे वे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत त्यानं उल्लेखनीय कामगिरी केली होती.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ ( Royal Challengers Bangalore Plyers List ) :
विराट कोहली, एबी डिविलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पडिक्कल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, ॲडम झम्पा, शाहबाज अहमद, फिन अॅलन, केन रिचर्डसन, पवन देशपांडे, ग्लेन मॅक्सवेल, सचिन बेबी, रजत पाटीदार, मोहम्मद अझरुद्दीन, कायले जेमिन्सन, डॅनिएल ख्रिस्टियन, के एस भारत, सूयश प्रभुदेसाई .
रॉयल चॅलेंजर्स संघाचे वेळापत्रक ( RCB Team Scheduled)
- ९ एप्रिल - वि. मुंबई इंडियन्स, चेन्नई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापासून)
- १४ एप्रिल - वि. सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापासून)
- १८ एप्रिल - वि. कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई ( दुपारी ३.३० वाजल्यापासून)
- २२ एप्रिल - वि. राजस्थान रॉयल्स, मुंबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापासून)
- २५ एप्रिल - वि. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई ( दुपारी ३.३० वाजल्यापासून)
- २७ एप्रिल - वि. दिल्ली कॅपिटल्स, अहमदाबाद ( सायंकाळी ७.३० वाजल्यापासून)
- ३० एप्रिल - वि. पंजाब किंग्स, अहमदाबाद ( सायंकाळी ७.३० वाजल्यापासून)
- ३ मे - वि. कोलकाता नाईट रायडर्स, अहमदाबाद ( सायंकाळी ७.३० वाजल्यापासून)
- ६ मे - वि. पंजाब किंग्स, अहमदाबाद ( सायंकाळी ७.३० वाजल्यापासून)
- ९ मे - वि. सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता ( सायंकाळी ७.३० वाजल्यापासून)
- १४ मे - वि. दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता ( सायंकाळी ७.३० वाजल्यापासून)
- १६ मे - वि. राजस्थान रॉयल्स, कोलकाता ( दुपारी ३.३० वाजल्यापासून)
- २० मे - वि. मुंबई इंडियन्स, कोलकाता ( सायंकाळी ७.३० वाजल्यापासून)
- २३ मे - वि. चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता ( सायंकाळी ७.३० वाजल्यापासून)