IPL 2021, KKR vs SRH T20 Live Score Update : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वात आज कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि सनरायझर्स हैदराबाद ( SunRisers Hyderabad ) यांच्यात सामना रंगणार आहे. आंद्रे रसेल+दिनेश कार्तिक विरुद्ध भुवनेश्वर कुमार+टी नटराजन+आदील राशिद यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. पण, या सामन्यापूर्वी SRHच्या आदील राशिदनं ( Adil Rashid) KKRचा खेळाडू बेन कटींग ( Ben Cutting) याची पत्नी एरीन हॉलंड ( Erin Holland) हिच्याशी सोशल वॉर सुरू केलं आहे. त्यामुळे मैदानावरील लढतीपूर्वीच KKR vs SRH हा सामना सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. IPL 2021 : KKR vs SRH T20 Live Score Update रोहित शर्मानं सामना गमावला पण मन जिंकलं; त्याच्या सामाजिक जाणीवेचे इंग्लंडच्या दिग्गजानं कौतुक केलं!
कोलकाता विरुद्ध हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक ६१६ धावा केल्या आहेत आणि भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक १९ विकेट घेतल्या आहेत. कोलकाताकडून शुबमन गिल यानं हैदराबादविरुद्ध सर्वाधिक ४४० धावा केल्या आहेत तर कुलदीप यादव आणि सुनील नरेन यांनी सर्वाधिक १० बळी घेतले आहेत. यावरून हॉलंड हीनं राशिदच्या एका पोस्टवर कमेंट केली. उद्याच्या सामन्यासाठी तयार आहे.. राशिदच्या या कमेंटवर हॉलंड हिनं कोलकाता जिंकेल, अशी कमेंट केली. त्यावर राशिद नाही असं म्हणाला. IPL 2021, IPL 2021 latest news
आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील दोन्ही संघांमधील हा २० वा सामना असेल. आयपीएलमध्ये दोन्ही संघ आतापर्यंत १९ वेळा एकमेकांना भिडले आहेत. यात केकेआरची बाजू उजवी ठरली आहे. कोलकात्याने १२ सामने जिंकले आहेत तर हैदराबादने केवळ ७ सामने जिंकले आहेत. भारतात झालेल्या आयपीएल स्पर्धेत कोलकाता आणि हैदराबाद आयपीएलच्या १७ सामन्यांमध्ये आमने सामने आले आहेत. यापैकी ७ सामन्यांमध्ये हैदराबादने विजय मिळवला आहे, तर १० सामन्यांमध्ये कोलकात्याने विजय मिळवला आहे. आयपीएलच्या गेल्या मोसमात दोन्ही संघ एकमेकांना दोनदा भिडले आणि दोन्ही वेळेस केकेआरने हैदराबादला पराभूत केलं आहे.IPL 2021 KKR vs SRH IPL 2021साठी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचा पाकिस्तानला ठेंगा; खवळलेल्या शाहिद आफ्रिदीचं वादग्रस्त विधान
Web Title: IPL 2021: Rashid Khan and Erin Holland engage in a cheeky Instagram banter ahead of the clash between SRH and KKR
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.