IPL 2021: 'वर्कलोड'मुळे विराट कोहलीनं टीम इंडियाचं कर्णधारपद सोडलं, आता RCBबाबतही घेणार हाच निर्णय?

आयपीएल २०२१च्या पहिल्या टप्प्यात RCBनं ७ पैकी ५ सामने जिंकून गुणतक्त्यात तिसरे स्थान पटकावले आहे आणि यंदा त्यांना जेतेपद पटकावण्याची संधी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 02:55 PM2021-09-17T14:55:18+5:302021-09-17T14:56:47+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021: RCB captain Virat Kohli resigns as India captain, will he also leave RCB captaincy at the end of season? | IPL 2021: 'वर्कलोड'मुळे विराट कोहलीनं टीम इंडियाचं कर्णधारपद सोडलं, आता RCBबाबतही घेणार हाच निर्णय?

IPL 2021: 'वर्कलोड'मुळे विराट कोहलीनं टीम इंडियाचं कर्णधारपद सोडलं, आता RCBबाबतही घेणार हाच निर्णय?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021: Will Virat Kohli continue as RCB captain? –'' कामाचा ताण ( Work Load) हा महत्त्वाचा भाग आहे आणि मागील ८-९ वर्षांपासून तीनही फॉरमॅटमध्ये वर्कलोड वाढला आहे आणि ५-६ वर्षांपासून मी नेतृत्वाची जबाबदारीही सांभाळत आहे. त्यामुळे मला आता स्वतःला थोडा वेळ द्यायला हवा, जेणेकरून मी वन डे व कसोटी संघाचे नेतृत्व समर्थपणे पेलू शकेन. ट्वेंटी-२०त मी टीम इंडियासाठी सर्वोत्तम दिले आणि पुढेही फलंदाज म्हणून योगदान देत राहीन,'' विराट कोहलीनं ( Virat Kohli) हे मत व्यक्त करताना आगामी वर्ल्ड कप स्पर्धेनंतर ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सोडणार असल्याचे जाहीर केलं. विराटच्या या निर्णयानंतर आता तो इंडियन प्रीमिअर लीगमधील ( IPL) फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore ) संघाचेही नेतृत्व सोडणार का?; असा सवाल विचारला जात आहे. 

 शिखर धवनसाठी विराट कोहली निवड समितीशी भांडला, पण...

"विराटची खेळाप्रती निष्ठा अतिशय चांगली होती. टी-२० विश्वचषकापूर्वी त्याला किमान दोन महिन्यांसाठी कॅप्टनसीपासून आराम मिळेल यासाठी तो RCB चं नेतृत्व सोडेल असं वाटलं होतं," अशी प्रतिक्रिया हर्षा भोगले यांनी दिली होती.

विराट कोहली सावध झाला अन् हकालपट्टी होण्याआधीच राजीनामा देऊन मोकळा झाला....

२०१३ पासून RCBच्या कर्णधारपदावर आहे आणि त्याला एकदाची आयपीएल चषक उंचावता आला नाही. त्याच्या वैयक्तिक कामगिरीचा आलेख हा चढाच राहिला, परंतु तरीही त्याला जेतेपदापासून वंचित रहावे लागले. त्यामुळे वर्कलोड सांगून त्यानं टीम इंडियाचे नेतृत्व सोडले, तसेच तो RCBचेही कर्णधारपद सोडेल का, असा प्रश्न विचारला जात आहे. 

रोहित शर्माला उप कर्णधारपदावरून हटवायचे होते विराट कोहलीला, पण उलटा पडला डाव...

आयपीएल २०२१च्या पहिल्या टप्प्यात RCBनं ७ पैकी ५ सामने जिंकून गुणतक्त्यात तिसरे स्थान पटकावले आहे आणि यंदा त्यांना जेतेपद पटकावण्याची संधी आहे. २०२२च्या आयपीएलमध्ये १० संघ खेळणार असल्यानं नव्यानं लिलाव होणार आहे. त्यासाठी प्रत्येक संघाला दोन खेळाडूंना कायम राखता येणार आहे आणि दोन खेळाडू  RTM कार्डनुसार घेता येतील. अशाच संपूर्ण संघच नवा असेल आणि विराटला पुन्हा नव्यानं सुरुवात करावी लागेल. 

  • - विराट कोहलीची आयपीएलमधील जय-पराजयाची आकडेवारी ही ६०-६५ अशी आहे
  • - त्याच्या विजयाची सरासरी ही ४८.०४ इतकी आहे आणि ही सर्वात निचांक कामगिरी आहे
  • - विराटनं १३२ आयपीएल सामन्यांत RCBचे नेतृत्व केले आहे आणि त्यात केवळ ६० सामने जिंकले आहेत
  • - रोहित शर्माची विजयाची सरासरी ही ६०.१६ इतकी आहे.  

 

जर विराट यंदाही आयपीएल जिंकण्यात अपयशी ठरला तर तो RCBचे नेतृत्वही सोडेल
 

Web Title: IPL 2021: RCB captain Virat Kohli resigns as India captain, will he also leave RCB captaincy at the end of season?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.