Join us  

IPL 2021, Virat Kohli: कोहलीला कर्णधारपदावरुन हटविण्याचा हालचाली?, संघ व्यवस्थापन नाराज

IPL 2021, Virat Kohli: आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगोलर (RCB) संघाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 4:09 PM

Open in App

IPL 2021, Virat Kohli: आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगोलर (RCB) संघाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. कोहलीनं पुढच्या सीझनपासून संघाचं नेतृत्त्व करणार नसल्याचं जाहीर केलेलं असलं तरी आता संघाकडूनच कोहलीला डच्चू देण्याची शक्यता बळावली आहे. कोहलीला याच सीझनमध्ये कर्णधारपदावरुन हटवण्याची तयारी संघ व्यवस्थापनानं सुरू केली असल्याचं वृत्त इनसाइड स्पोर्ट्सनं प्रकाशित केलं आहे. संघ व्यवस्थापन कोहलीच्या एकंदर वागणुकीबाबत नाखूष असल्याचं बोललं जात आहे. 

बिग ब्रेकिंग! IPL मध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव; सनरायझर्सचा टी. नटराजन पॉझिटिव्ह

विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील सुरुवात निराशाजनक झाली आहे. कोलकाला नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात आरसीबीला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. आरसीबीचा संघ अवघ्या ९२ धावांमध्ये गारद झाला होता. यात कोहलीनं फक्त ५ धावा केल्या. संपूर्ण सामन्यात कोहलीच्या वागणुकीतही बदल झालेला पाहायला मिळाल्याचं मत संघ व्यवस्थापनाचं झालेलं आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. 

राहुल-मयांकची 'गट्टी', पण जमेना संघाची 'भट्टी'; राजस्थाननं अशी केली पंजाबची 'छुट्टी'!

सामन्याच्या आधीच कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा कोहलीनं केली होती आणि त्याचाच परिणाम संपूर्ण सामन्यात त्याच्या वावरण्यातून दिसून येत होता. याशिवाय कोहलीच्या सलामीच्या फलंदाजीच्या निर्णयाबाबत प्रशिक्षक माइक हेसन देखील सहमत नव्हते, अशी माहिती समोर आली आहे. केकेआर विरुद्धच्या पराभवानंतर बंगलोर संघ व्यवस्थापन कोहलीवर अत्यंत नाराज असल्याचं वृत्त इनसाइड स्पोर्ट्सनं दिलं आहे. याच पार्श्वभूमीवर संघ व्यवस्थापनाकडून सीझनच्या मध्यातच कर्णधार बदलण्याची घोषणा केली जाऊ शकते असं अंदाज व्यक्त केला आहे. 

गौतम गंभीरनं व्यक्त केली नाराजीविराट कोहलीच्या कर्णधारपदावरुन पायऊतार होण्याच्या निर्णयावर माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनंही नाराजी व्यक्त केली होती. सीझन सुरू असतानाच असं कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा करणं योग्य नाही. याचा संघातील खेळाडूंच्या मानसिकतेवर परिणाम होतो. तुमचं लक्ष विचलीत होतं आणि संघाच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो. असंच काहीचं पहिल्या सामन्यात पाहायला मिळालं आहे, असं गंभीर म्हणाला. 

टॅग्स :आयपीएल २०२१विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App