मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रविवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या ४ बाद १९१ धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला ९ बाद १२२ धावा करता आल्या. CSKनं हा सामना ६९ धावांनी जिंकला. रवींद्र जडेजाच्या ( २८ चेंडू नाबाद ६२ धावा, ४-१-१३-३ अशी गोलंदाजी अन् एक अफलातून रन आऊट... ) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) हा सामना जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली. CSKचा हा सलग चौथा विजय ठरला, तर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा ( Royal Challengers Banglore) IPL 2021मधील पहिलाच पराभव ठरला. या पराभवासह कर्णधार विराट कोहलीला ( Virat Kohli) आणखी एक जबरदस्त धक्का बसला. होय, एकट्या रवींद्र जडेजानं आम्हाला पराभूत केलं; CSKच्या खेळाडूचं विराट कोहलीकडून कौतुक
ऋतुराज गायकवाड ( ३३) व फॅफ ड्यू प्लेसिस ( ५०) यांनी चेन्नईला चांगली सुरुवात करून दिली या दोघांनी ७४ धावांची भागीदारी केली. सुरेश रैनानं १८ चेंडूत २४ धावा केल्या. रवींद्र जडेजानं २८ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकार खेचून नाबाद ६२ धावा चोपल्या. हर्षल पटेलनं टाकलेल्या २० व्या षटकात जडेजानं ३६ धावा चोपल्या, तर एक नो बॉलमुळे आयपीएलमधील हे सर्वात महागडे ( ३७ धावा) षटक ठरले. IPL 2021 latest news, CSK Vs RCB IPL Matches रवींद्र जडेजा एकटा भिडला, विराट कोहलीच्या RCBला पुरून उरला; विक्रमांचा धो धो पाऊस पाडला!
प्रत्युत्तरात विराट कोहली व देवदत्त पडीक्कल यांनी दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी ३ षटकांत ४४ धावा चोपल्या. पण, फलंदाजीत कमाल दाखवणाऱ्या रवींद्र जडेजानं गोलंदाजीतही RCBवर वर्चस्व गाजवले. जडेजानं ४ षटकांत एक निर्धाव षटकासह १३ धावांत ३ विकेट्स घेतल्या. इम्रान ताहीरनं १६ धावांत २ विकेट्स घेतल्या. RCBला ९ बाद १२२ धावा करता आल्या अन् CSKनं ६९ धावांनी दणदणीत विजय साजरा केला. ६, ६, ७nb, ६, २, ६, ४; रवींद्र जडेजाचा अखेरच्या षटकात RCBवर 'प्रहार'! Watch Video
विराट कोहलीला १२ लाखांचा दंड
CSKविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीला १२ लाखांचा दंड भरावा लागला. षटकांची गती संथ ठेवल्यामुळे BCCIनं त्याच्यावर ही दंडात्मक कारवाई केली. त्याच्याकडून प्रथमच ही चूक झाल्यामुळे त्याला १२ लाखांचा दंड भरावा लागणार आहे. IPL 2021त आतापर्यंत महेंद्रसिंग धोनी, इयॉन मॉर्गन, रोहित शर्मा आणि विराट यांच्यावर षटकांची गती संथ राखल्यामुळे दंडात्मक कारवाई झाली आहे. त्यांच्याकडून आणखी दोनवेळा ही चूक झाल्यास त्यांच्यावर एका सामन्याची बंदी लावण्यात येईल.
Web Title: IPL 2021 : RCB skipper Virat Kohli has been fined INR 12 Lakh for maintaining a slow over-rate against CSK
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.