Join us  

IPL 2021, RCB vs CSK, Live: ६, ६, ७nb, ६, २, ६, ४; रवींद्र जडेजाचा अखेरच्या षटकात RCBवर 'प्रहार'! Watch Video

ipl 2021  t20 CSK Vs RCB live match score updates Mumbai : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रविवारी रवींद्र जडेजानं ( Ravindra Jadeja) दाणपट्टा चालवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 6:03 PM

Open in App

ipl 2021  t20 CSK Vs RCB live match score updates Mumbai : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रविवारी रवींद्र जडेजानं ( Ravindra Jadeja) दाणपट्टा चालवला. १९व्या षटकापर्यंत चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) ४ बाद १५४ धावा केल्या होत्या आणि पर्पल कॅप शर्यतीत आघाडीवर असलेला हर्षल पटेल ( Harshal Patel) अखेरचं षटक टाकणार होता. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( Royal Challengers Bangalore) समोर जास्तीत जास्त १७० पर्यंत लक्ष्य ठेवले जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण, अखेरच्या षटकात घडले वेगळेच. मुंबईच्या गरमीनं थकलेल्या रवींद्र जडेजानं तुफान फटकेबाजी केली. Big Blow : राजस्थान रॉयल्सला आणखी एक मोठा धक्का, ऑसी गोलंदाजाची माघार; सोबतीला उरले फक्त चारच परदेशी खेळाडू! CSK Vs RCB, CSK Vs RCB live score

फॉर्मात परतलेल्या ऋतुराज गायकवाड व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी चेन्नईला चांगली सुरुवात करून दिली या दोघांनी ७४ धावांची भागीदारी केली. ऋतुराज ( ३३) माघारी परतला.   रैनानं १८ चेंडूत २४ धावा केल्या. तर अंबाती रायुडूनं ७ चेंडूत १४ धावांचं योगदान दिलं. सामन्यात हर्षल पटेल यानं तीन विकेट्स जरी घेतल्या, परंतु जडेजानं त्याच्या मेहनतीवर पाणी फिरवले.  फॅफनं ४१ चेंडूंत ५ चौकार व १ षटकार खेचून ५० धावा केल्या. IPL 2021 latest news, CSK Vs RCB IPL Matches, CSK Vs RCB IPL match 2021

जडेजानं पहिल्या चेंडूवर डीप मिडविकेटच्या दिशेनं षटकार खेचला. त्यानंतर यॉर्कर चेंडूवर पुन्हा त्याच दिशेनं षटकार खेचला. हर्षलनं तिसरा चेंडू फुलटॉस फेकला आणि जडेजानं त्यालाही सीमापार टोलवले. पंचांनी तो नो बॉल दिला अन् फ्री हिटवरही जडेजान डीप मिडविकेटवर षटकार खेचला. त्यानंतर पुढील तीन चेंडूंवर २, ६ व ४ अशा धावा आल्या. जडेजानं या षटकांत ३६ धावा चोपल्या, तर एक नो बॉलमुळे आयपीएलमधील हे सर्वात महागडे ( ३७ धावा) षटक ठरले. जडेजानं २८ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकार खेचून नाबाद ६२ धावा चोपल्या. CSK Vs RCB T20 Match, CSK Vs RCB Live Score, IPL 2021 CSK Vs RCB, CSK Vs RCB Live Match

पाहा व्हिडीओ... आयपीएलमध्ये एकाच षटकात सर्वाधिक धावा करणाऱ्या ख्रिस गेलच्या विक्रमाशी आज जडेजानं बरोबरी केली. ख्रिस गेलनं २०११मध्ये पी परमेश्वरनच्या षटकात ४ षटकार व ३ चौकार खेचून ३६ धावा कुटल्या होत्या. 

टॅग्स :आयपीएल २०२१रवींद्र जडेजाचेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर