IPL 2021, RCB Vs KKR, Eliminator IPL 2021: kolkata knight Ridersला andre russellच्या तंदुरुस्त होण्याची आशा

IPL 2021, RCB Vs KKR, Eliminator IPL 2021: Royal Challengers Bangalore आणि kolkata Knight Ridersची कठोर मेहनत आणि अखेरपर्यंतच प्रयत्न हा आता भूतकाळ झाला आहे. मात्र येथे लढत बरोबरीची आहे. एक सोडलेला झेल किंवा एक नोबॉल, एक धावबाद एक चांगले किंवा खराब षटक पूर्ण सामना बदलून टाकू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 06:30 AM2021-10-11T06:30:34+5:302021-10-11T06:34:30+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, RCB Vs KKR, Eliminator IPL 2021: kolkata knight riders hope andre russell's fit | IPL 2021, RCB Vs KKR, Eliminator IPL 2021: kolkata knight Ridersला andre russellच्या तंदुरुस्त होण्याची आशा

IPL 2021, RCB Vs KKR, Eliminator IPL 2021: kolkata knight Ridersला andre russellच्या तंदुरुस्त होण्याची आशा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- सुनील गावसकर
बंगळुरू आणि कोलकाताची कठोर मेहनत आणि अखेरपर्यंतच प्रयत्न हा आता भूतकाळ झाला आहे. मात्र येथे लढत बरोबरीची आहे. एक सोडलेला झेल किंवा एक नोबॉल, एक धावबाद एक चांगले किंवा खराब षटक पूर्ण सामना बदलून टाकू शकते. दोन्ही संघांचे नेतृत्व अशा खेळाडूंच्या हाती आहे ज्यांनी नाण्याच्या या दोन्ही बाजू पाहिल्या आहेत. त्यासाठी ते दोन्ही आपल्या संघांना सर्व बाबी सहज ठेवण्यासाठी नक्कीच प्रेरित करतील. प्रत्येक चेंडूला गुणवत्तेने खेळावे लागेल आणि सामना आणि स्वत:लादेखील वाचवावे लागेल. तणाव हा प्रत्येक चेंडूनुसार वाढत जाणार आहे. या दबावात हे सर्व करणे सोपे नसेल. 
बँगलोरने टेबल टॉपर दिल्लीविरोआत अखेरच्या चेंडूवर शानदार विजय मिळवला. संघाकडे युवा के. एस. भरत हा आहे. त्याने स्वत:ला शांत ठेवले आणि षटकार लगावला. लक्ष्याचा शानदार पाठलागदेखील केला. मॅक्सवेलनेही हाच मार्ग दाखवला. भरतने काही साहसी शॉट लगावले. मात्र हे विसरता कामा नये की, त्याने ही कामगिरी २० षटके यष्टिरक्षण केल्यानंतर केली आहे. तो अखेरच्या चेंडूंपर्यंत खेळपट्टीवर फलंदाजी करत होता. त्यामुळे हे समजते की, त्याच्यात स्टॅमिना आणि ताकद किती आहे. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे त्याने कठीण वेळेत देखील धैर्य कायम ठेवले आणि शानदार खेळ केला. कोलकाताकडे व्यंकटेश अय्यर हा प्रतिभावान खेळाडू आहे. मात्र तो किती पुढे जाईल हे लवकर सांगणे कठीण आहे. सध्या अशा खेळाडूकडे लक्ष जात आहे ज्यांना आव्हाने स्वीकारायला आवडतात.  तो गोलंदाजीतदेखील उपयोगी आहे. प्रत्येक कर्णधाराला अशा खेळाडूची गरज असते. आंद्रे रसेलच्या खेळण्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. जर तो फिट असेल तर कोलकाताच्या मधल्या फळीला त्याचा फायदा होईल. तो असा खेळाडू आहे. जो गोलंदाजी आणि फलंदाजीने सामना कधीही बदलवू शकतो. त्यामुळे कोलकाताचा संघ त्याच्या तंदुरुस्त होण्याची आशा करत असेल. फर्ग्युसन याने कोलकातासाठी शानदार खेळ केला आहे. त्यासोबत सुनील नारायण आणि वरुणच्या रूपाने मिस्ट्री स्पिनर उपलब्ध आहेत. ते कोलकाताच्या गोलंदाजीला धारदार बनवतात. शारजाहच्या मैदानात सीमारेषा लहान आहेत. त्यामुळे कर्णधार अखेरची षटके कुणाकडून करवून घेतात हेदेखील महत्त्वाचे ठरेल. हा सामना ‘करा अथवा मरा’ असाच असेल.  या सामन्यातील पराभूत संघाला घरी जावे लागणार आहे. (टीसीएम)

Web Title: IPL 2021, RCB Vs KKR, Eliminator IPL 2021: kolkata knight riders hope andre russell's fit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.