Join us  

IPL, 2021 RCB vs KKR Eliminator Live : विराट कोहलीनं नाणेफेक जिंकली, कोलकातानं आंद्रे रसेलला दिली नाही संधी

RCB vs KKR Eliminator Live : यांच्यातल्या जय-पराजयाच्या आकडेवारीत कोलकाताचे पारडे १५-१३ असे वरचढ आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 7:08 PM

Open in App

IPL, 2021 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Eliminator Live : विराट कोहली ( Virat Kohli) याला कर्णधार म्हणून आयपीएल जेतेपद पटकावण्याची शेवटची संधी आहे. आयपीएल २०२१नंतर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा विराटनं केली होती. त्यामुळे आजच्या एलिमिनेटर सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सला ( KKR) पराभूत करून जेतेपदाच्या स्वप्नाच्या दिशेनं पाऊल टाकण्यासाठी विराट अँड टीम सज्ज आहे. KKRनंही आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात दमदार कमबॅक करून टॉप फोअरमध्ये एन्ट्री मिळवत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्यांना कमी लेखण्याची चूक RCB करणार नाही.

RCB vs KKR यांच्यातल्या जय-पराजयाच्या आकडेवारीत कोलकाताचे पारडे १५-१३ असे वरचढ आहे. आजच्या सामन्यात त्यांच्या ताफ्यात शाकिब अल हसन मुकणार आणि आंद्रे रसेलचे ( Andre Russell) कमबॅक होणार असा अंदाज होता, पण, शाकिब संघात कायम आहे. विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यानं शारजात धावांचा पाऊस पाडण्याचे आश्वासन दिले. RCBच्या ताफ्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कोलकातानंही तोच संघ कायम राखण्याचा निर्णय घेतला. 

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, ग्लेन मॅक्सवेल, के भरत, एबी डिव्हिलियर्स, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, डॅन ख्रिस्टियन, शाहबाज अहमद, हर्षल पटेल,  जॉर्ज गार्टन

कोलकाता नाइट रायडर्स - शुबमन गिल, वेंकटेश अय्यर, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, शाकिब अल हसन, इयॉन मॉर्गन, दिनेश कार्तिक, सुनील नरीन, ल्युकी फर्ग्युसन, शिवम मावी, वरुण चक्रवर्थी. 

टॅग्स :आयपीएल २०२१रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकोलकाता नाईट रायडर्स
Open in App