Join us  

IPL, 2021 RCB vs KKR Eliminator Live : अम्पायरच्या चुकीच्या निर्णयांचा RCBला फटका, विराट कोहलीनं गमावला ताबा अन् विचारला जाब!

Virat Kohli lost his cool at umpire's for their poor decisions कोलकाता नाइट रायडर्सच्या ( KKR) गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला ( RCB) ७ बाद १३८ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 10:16 PM

Open in App

IPL, 2021 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Eliminator Live : कोलकाता नाइट रायडर्सच्या ( KKR) गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला ( RCB) ७ बाद १३८ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. सुनील नरीननं २१ धावांत ४, ल्युकी फर्ग्युसननं ३० धावांत २ विकेट्स घेतल्या. या सामन्यात अम्पायरच्या चुकीच्या निर्णयाचाही RCBला फटका बसलेला पाहायला मिळाला आणि त्यांच्या दोन धावा कमी झाल्या. सामन्यानंतर अम्पायरनं ढापलेल्या दोन धावांचीच चर्चा रंगली. अम्पायरनं तीन निर्णय RCBच्या विरोधात दिले होते, DRS मुळे ते बदलले गेले. पण, विराटनं मात्र ताबा गमावला.. 

पहिली धाव १६व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर ढापली गेली. वरुण चक्रवर्थीच्या गोलंदाजीवर शाहबाज अहमदसाठी LBWची अपील झाली. शाहबाजनं रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला अन् चेंडू त्याच्या पॅडला लागला. वरूणनं अपील केली आणि अम्पायरनं त्याला बाद दिले. शाहबाजनं लगेच DRS घेतला आणि त्यात तो नाबाद ठरला. पण, चेंडू पॅडला लागून जेव्हा शाहबाज धाव पूर्ण करणार त्याआधीच अम्पायरनं त्याला बाद दिल्यानं ती धाव ग्राह्य धरली गेली नाही. तेव्हा ग्लेन मॅक्सवेलनं अम्पायरला जाब विचारला.  

२० व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर शिवम मावीच्या गोलंदाजीवर हर्षल पटेलसाठी LBW अपील झाले.  त्यालाही बाद दिले गेले आणि त्यानं DRS घेतला. अल्ट्रा एजमध्ये बॅटची किनार लागल्याचे दिसले अन् पटेल नाबाद राहिला. पण, तिही धाव नाकारण्यात आली. असा RCBला दोन धावांचा फटका बसला.  कोलकाताच्या डावातील ७व्या षटकात युझवेंद्र चहलच्या गुगलीवर राहुल त्रिपाठी पायचीत झाला. पण मैदानावरील अम्पायरनं त्याला नाबाद दिले. विराटनं DRS घेतला अन् त्यात त्रिपाठी बाद असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर विराटचा पारा चढला अन् त्यानं अम्पायरला जाब विचारला.

टॅग्स :आयपीएल २०२१विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकोलकाता नाईट रायडर्स
Open in App