IPL, 2021 RCB vs KKR Eliminator Live : विराट कोहलीचा मोठा विक्रम, रोहित शर्मालाही जमला नाही हा पराक्रम! 

IPL, 2021 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Eliminator Live : KKRचा कर्णधार इयॉन मॉर्गन यानं डावाची सुरुवात शाकिब अल हसनकडून करून घेतली. मॉर्गननं पहिल्या चार षटकांत हसन, शिवम मावी, वरुण चक्रवर्थी व ल्युकी फर्ग्युसन यांच्याकडून टाकून घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 08:02 PM2021-10-11T20:02:57+5:302021-10-11T20:03:40+5:30

whatsapp join usJoin us
IPL, 2021 RCB vs KKR Eliminator Live : Virat Kohli becomes the second Indian player to smash 900 fours in T20 cricket | IPL, 2021 RCB vs KKR Eliminator Live : विराट कोहलीचा मोठा विक्रम, रोहित शर्मालाही जमला नाही हा पराक्रम! 

IPL, 2021 RCB vs KKR Eliminator Live : विराट कोहलीचा मोठा विक्रम, रोहित शर्मालाही जमला नाही हा पराक्रम! 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL, 2021 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Eliminator Live : रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या ( RCB) सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. कोलकाता नाइट रायडर्सनं पॉवर प्लेमध्ये धावांची गती थांबवली नसली तरी त्यांनी देवदत्त पडिक्कलला माघारी पाठवून RCBला धक्का दिला. विराट कोहलीच्या ( Virat Kohli) टीमनं पॉवर प्लेमध्ये १ बाद ५३ धावा केल्या. विराटनं पहिल्या सहा षटकांत मोठा पराक्रम केला. जगात फक्त दोनच भारतीयांना अशी कामगिरी करता आलेली आहे आणि रोहित शर्मालाही हा पराक्रम जमलेला नाही. 

RCB vs KKR यांच्यातल्या जय-पराजयाच्या आकडेवारीत कोलकाताचे पारडे १५-१३ असे वरचढ आहे. आजच्या सामन्यात त्यांच्या ताफ्यात शाकिब अल हसन मुकणार आणि आंद्रे रसेलचे ( Andre Russell) कमबॅक होणार असा अंदाज होता, पण, शाकिब संघात कायम आहे. विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यानं शारजात धावांचा पाऊस पाडण्याचे आश्वासन दिले. RCBच्या ताफ्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कोलकातानंही तोच संघ कायम राखण्याचा निर्णय घेतला. 

KKRचा कर्णधार इयॉन मॉर्गन यानं डावाची सुरुवात शाकिब अल हसनकडून करून घेतली. मॉर्गननं पहिल्या चार षटकांत हसन, शिवम मावी, वरुण चक्रवर्थी व ल्युकी फर्ग्युसन यांच्याकडून टाकून घेतली. विराट कोहली व देवदत्त पडिक्कल या जोडीनं थोडासा सावध पण आश्वासक खेळ करताना RCBची धावसंख्या हलती ठेवली.

विराटनं पाचव्या षटकात चौकार खेचून एका विक्रमाला गवसणी घातली. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ९०० चौकार मारणारा विराट हा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. Most fours in T20 Cricket ख्रिस गेल ११०५ चौकारांसह अव्वल स्थानावर आहे. त्यापाठोपाठ शिखर धवन ( ९८६), डेव्हिड वॉर्नर ( ९७३), अॅलेक्स हेल्स ( ९६४), आरोन फिंच ( ९५६), ब्रेंडन मॅकलम ( ९२४) व विराट ( ९००* ) यांचा क्रमांक येतो.  

देवदत्तनं आयपीएलच्या सलग दुसऱ्या पर्वात ४०० धावा पूर्ण केल्या, परंतु आज त्याला मोठी खेळी करता आली नाही. फर्ग्युसननं टाकलेला चेंडू त्याच्या बॅटची किनारा घेत यष्टींवर आदळला अन् देवदत्तला २१ धावांवर माघारी जावं लागलं. त्यानं विराटसह पहिल्या विकेटसाठी ४९ धावा जोडल्या. 
 

Web Title: IPL, 2021 RCB vs KKR Eliminator Live : Virat Kohli becomes the second Indian player to smash 900 fours in T20 cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.