Join us  

IPL, 2021 RCB vs KKR Eliminator Live : रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या दोन खेळाडूंनी IPL बायो बबल सोडलं, KKRविरुद्धच्या लढतीपूर्वी धक्का!

IPL, 2021 RCB vs KKR Eliminator Live : कोलकातानं जोरदार मुसंडी मारून सर्वांना थक्क केले. त्यामुळे RCBविरुद्ध त्यांचे पारडे जड मानले जात आहे आणि त्यात आजच्या लढतीपूर्वी विराट कोहली अँड टीमला दोन धक्के बसले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 3:59 PM

Open in App

IPL, 2021 RCB vs KKR Eliminator Live : चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) क्वालिफायर १ सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर ( Delhi Capitals) विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. आज एलिमिनेटर लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( Royal Challengers Bangalore) आणि कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) यांच्यात लढत होत आहे. आयपीएलच्या इतिहासात RCB vs KKR प्रथमच प्ले ऑफ लढतीत एकमेकांना भिडतील. कोलकातानं जोरदार मुसंडी मारून सर्वांना थक्क केले. त्यामुळे RCBविरुद्ध त्यांचे पारडे जड मानले जात आहे आणि त्यात आजच्या लढतीपूर्वी विराट कोहली अँड टीमला दोन धक्के बसले. त्यांच्या ताफ्यातील दोन खेळाडूंनी आयपीएल ( IPL Bio Bubble)  सोडलं आणि आजच्या सामन्यात ते उपलब्ध नसणार आहेत. RCBनं त्याची घोषणा केली.

आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होण्यापूर्वी RCBनं श्रीलंकेचा फिरकीपटू वनिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga ) आणि दुष्मंथा चमिरा ( Dushmantha Chameera) यांना ताफ्यात दाखल करून घेतले होते. भारताविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत हसरंगानं दमदार कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले होते आणि त्यानंतर RCBनं त्याला ताफ्यात दाखल करून घेतले. पण, हसरंगाला केवळ दोन सामन्यांत संधी मिळाली आणि चमिरा बाकावर बसूनच राहिला. या दोघांनी आता आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आयपीएल बायो बबल सोडला आहे. श्रीलंकेचा संघ यूएईत दाखल झाला असून ही दोघं राष्ट्रीय संघासोबत आता वर्ल्ड कपची तयारी करणार आहेत.  श्रीलंकेनं संघात लाहिरू कुमारा, पथूम निसांका, अकिला धनंजया आणि बिनुरा फर्नांडो यांची निवड केली आहे. त्यांनी कामिंदू मेंडीस, नुवान प्रदीप, प्रविण जयाविक्रमा आणि लाहिरी मदुसंका यांना डच्चू दिला. मुख्य स्पर्धेपूर्वी श्रीलंकेचा संघही दोन सराव सामने खेळणार आहे. त्यांचा पहिला सराव सामना बांगलादेशविरुद्ध आहे, तर १४ ऑक्टोबरला ते पपुआ न्यू गिनीविरुद्ध खेळतील.

श्रीलंका - दासून शनाका, कुसल परेरा, दीनेश चंडीमल, धनंजया डी सिल्व्हा, पाथूम निसंका, चरिथ असालंका, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षा, चमिका करुणारत्ने, वनिंदू हसरंगा, दुष्मंथा चमिरा, लाहिरू कुमारा, महिष थिक्षणा, अकिला धनंजया, बिनुरा फर्नांडो  

टॅग्स :आयपीएल २०२१रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकोलकाता नाईट रायडर्सटी-20 क्रिकेट
Open in App