आयपीएलच्या २०२१ च्या दुसऱ्या टप्पात आज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) असा सामना होत आहे. सामन्याची नाणेफेक जिंकून विराट कोहलीनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. बंगलोरच्या संघात आज दोन युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. भारतीय युवा फलंदाज केएस भरत आणि श्रीलंकेच्या युवा गोलंदाज हसरंगा यांचा पहिलाच आयपीएल सामना असणार आहे. तर कोलकाताच्या संघात काही नवे बदल करण्यात आलेले नाहीत. कोलकाताकडून आंद्रे रसेलच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष असणार आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली या हंगामाती पहिल्या टप्प्यात अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सात पैकी पाच सामने जिंकणारा आरसीबी संघ आपली गती कामय ठेवण्याच्या उद्देशानेच मैदानात उतरणार आहे. तर दोन वेळचा (२०१२ आणि २०१३) विजेता केकेआर आपल्या नव्या टप्प्याची सुरूवात करताना स्पर्धेत टीकून राहण्याचा प्रयत्न करणार आहे. आरसीबीही आठ सामन्यांतून १० गुण प्राप्त करत तिसऱ्या स्थानी तर सात सामन्यांतून केवळ २ विजयांसह केकेआर ७ व्या स्थानी आहे. कोलकाताचे पारडे जड इयॉन मॉर्गन याच्या नेतृत्वाखालील केकेआर संघाला २०१४ प्रमाणेच नशीबाने साथ दिली तर ते विजेतपद पटकावण्याच्या तयारीत आहेत. संघाचे मेंटॉर डेव्हिड हसी यांना याबद्दल खात्री आहे.
RCB vs KKR, Playing XI:
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB): विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, केएस भरत, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिविलियर्स, सचिन बेबी, वाहिंदु हसरंगा, काइल जॅमीसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, यजुवेंद्र चहल
कोलकाता नाइट रायडर्स (KKR): इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तीक, वेंकटेश अय्यर, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, शुभमन गिल, सुनील नारायण, लॉकी फर्ग्यूसन, एम. प्रसिद्ध कृष्णा, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल