End of Virat Kohli the captain in IPL history - २०११ ते २०२१ या कालावधीत विराट कोहलीनं ( Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) संघाचे १४० सामन्यांत नेतृत्व केले आणि त्यापैकी ६६ सामने जिंकले, तर ७० मध्ये पराभव पत्करला. १३९ डावांमध्ये त्यानं ५ शतकं व ३५ अर्धशतकांसह ४१.९९च्या सरासरीनं ४८७१ धावा केल्या. सोमवारी कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) विरुद्धच्या पराभवानंतर विराटच्या डोळ्यांत पाणी दाटून आलेले सर्वांनी पाहिले आणि त्याचा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल होताच चाहतेही भावनिक झाले.
आजच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल बाजूने लागताच विराटनं फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, ० बाद ४९ वरून RCBची गाडी घसरली ती पुन्हा ट्रॅकवर आलीच नाही. KKRचा कर्णधार इयॉन मॉर्गन यानं गोलंदाजांचा योग्य वापर करून घेताना RCBच्या धावांना लगाम लावला.
विराट कोहली ( ३९) आणि देवदत्त पडिक्कल ( २१) हे सलामीवीर वगळले तर RCBचे स्टार आज जमिनीवर आपटले. सुनील नरीननं RCBला मोठे धक्के देताना के भरत, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स व ग्लेन मॅक्सवेल यांची विकेट घेतली. नरीननं २१ धावांत ४ , तर ल्युकी फर्ग्युसननं ३० धावांत २ विकेट्स घेत RCBला ७ बाद १३५ धावांवर रोखले.
शुबमन गिल ( २९) व वेंकटेश अय्यर ( २६) यांनी कोणताही धोका न पत्करता सावध खेळ करून पहिल्या विकेटसाठी ४१ धावा जोडल्या. पण, हर्षल पटेल व युझवेंद्र चहल यांनी KKRला धक्के देण्यास सुरुवात केले. नितीश राणा ( २३) चुकीचा फटका मारून बाद झाला. सुनील नरीननं मैदानावर येताच सलग तीन षटकार खेचून KKRवरील दडपण कमी केलं, परंतु मोक्याच्या वेळेला तोही बाद झाला. मोहम्मद सिराजनं १९व्या षटकात दिलेले दोन धक्के RCBला विजय मिळवून देणारे ठरतात, असे वाटू लागले. पण, इयॉन मॉर्गन व शाकिब अल हसन यांनी संयमी खेळ करताना KKRचा विजय पक्का केला. सिराज, हर्षल व युझवेंद्र यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
Web Title: IPL, 2021 RCB vs KKR : Virat Kohli as Captain of RCB for the very last time; RCB Captain crying video goes viral Watch
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.